मनसे आमदार पुत्राच्या गाडीचा विचित्र अपघात, कारचा चक्काचूर!

मनसे आमदार पुत्राच्या गाडीचा विचित्र अपघात, कारचा चक्काचूर!

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या मुलाच्या गाडीचा डोंबिवलीमध्ये अपघात झाला. गाडी भरधाव वेगाने उड्डाणपुलावरून थेट कोकण रेल्वे रुळावर कोसळली.

  • Share this:

मुंबई, 19 डिसेंबर : मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या मुलाच्या गाडीचा डोंबिवलीमध्ये अपघात झाला. गाडी भरधाव वेगाने उड्डाणपुलावरून थेट कोकण रेल्वे रुळावर कोसळली. रात्री साडे अकराच्या सुमारास हा अपघात झाला. यात कारचे नुकसान झाले असून कोणतीही जिवित हानी झाली नसल्याचे समजते.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, डोंबिवलीतील एक्सपेरीया मॉल ते काटई टोल नाक्याजवळ कारचा अपघात झाला. या ठिकाणी असलेल्या उड्डाणपुलावरुन कार भरधाव वेगाने खाली कोकण रेल्वे रुळावर कोसळली. ही कार मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचा मुलगा आदित्य पाटील यांची आहे. अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मनसे आमदार राजू पाटील यांच्या मुलाची गाडी पेट्रोल भरून काटई नाका ते पलावा सिटी येथे निघाले होती. त्यावेळी एक्सपेरीया मॉल उड्डाणपुलावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट उड्डाण पुलाखाली असलेल्या कोकण रेल्वे रुळावर पडली. या अपघातात कोणीही जखमी झाले नसून गाडीतील चालकाला थोडंदेखील खरचटलं नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

अपघातग्रस्त कार ही 'मुश्तान्ग' कंपनीची आहे. या गाडीची किंमत 75 लाख इतकी आहे. अपघातानंतर आमदार राजू पाटील यांच्याशी संपर्क साधला असता यामध्ये कोणाला साधं खरचटलंसुद्धा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Published by: Manoj Khandekar
First published: December 19, 2019, 7:06 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading