मनसेच्या एकमेव आमदारांचा थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले 'हीच ती वेळ!'

मनसेच्या एकमेव आमदारांचा थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले 'हीच ती वेळ!'

PM नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट गुंडाळणार का?

  • Share this:

प्रदीप भणगे,(प्रतिनिधी)

मुंबई,2 डिसेंबर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 'आता 'U''T'urn नको! बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्र सरकारला द्यावे लागणारा हिस्सा व त्यासाठी BKC व इतर ठिकाणी भू संपादीत करायला लागणाऱ्या हजारो कोटी राज्याच्या इतर लोकोपयोगी कामांसाठी वापरावे. बुलेट ट्रेन प्रकल्प बासनात गुंडाळायची #हीच ती वेळ आहे.', असे ट्वीट आमदार राजू पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, भाजपसोबत असलेली शिवसेना आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत आली आहे. शिवसेनेने आता भाजपच्या कार्यकाळात घेतलेले निर्णय आणि मंजूर केलेल्या प्रकल्पाचे परीक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसह राज्यातील अनेक प्रकल्पांचा समावेश आहे.

PM नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट गुंडाळणार का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेवर येताच कामाचा आढावा घ्यायला सुरूवात केली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या काळात अनेक पायाभूत प्रकल्प मुंबईसह राज्यभरात सुरू झाले आहेत. त्यामुळे त्या सगळ्या प्रकल्पांचे काय होणार? राज्य सरकार त्यात बदल करणार का? केंद्राची मदत त्या प्रकल्पांना मिळेल का? असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत. त्यातच उद्धव ठाकरे यांनी आरे मधल्या मेट्रोच्या कारशेड बांधकामाला स्थगिती दिल्याने चांगलीच चर्चा रंगली होती. त्यानंतर सगळ्यांचे लक्ष लागलंय ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाकडे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी सोमवारी स्पष्टीकरण दिले आहे.

विधिमंडळात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, गेल्या 5 वर्षांत आम्ही सत्तेत होतो. पण 5 वर्षांत विकासकामे कधी, कुठे कशी झाली किती खर्च झाला याबाबत मी माहिती मागवली आहे. त्या सगळ्यांची श्वेतपत्रिका काढणार आहोत.काही विकासकामे ज्यांची तातडीने आवश्यकता नाही ते पाहत आहोत.

काही विकासकामे करणे गरजेचे आहे. पण ती कामे रखडलेली आहे तेही पाहणार आहोत. हे फक्तं माझं सरकार नाही...तर तूमचं सर्वांचे सरकार आहे. सर्वसामान्यांचे हे सरकार आहे. बुलेट ट्रेन चा आढावा घेऊ, बुलेट ट्रेन अजूनही रद्द केली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आरे करशेड व्यतिरिक्त मी मेट्रोच्या कोणत्याही कामाला विरोध केला नाही. आक्षेप असता तर मेट्रो अडवली असती. वृक्षतोड नाही तर त्यातील अनेक जीवांना धोका आहे. प्रत्येक जिल्ह्यात सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार. खाते वाटपासंदर्भात आम्ही तीनही पक्ष अत्यंत समजूतीने चर्चा करून अंतीम खाते वाटप आम्ही जाहीर करू असंही त्यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2019 03:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading