मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /ठाण्यात मनसैनिकांकडून तृतीयपंथीला बेदम चोप

ठाण्यात मनसैनिकांकडून तृतीयपंथीला बेदम चोप

ठाण्यात मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी तृतीयपंथीला बेदम चोप दिलाय. माजीवाड नाका येथे रस्त्यानं चालणाऱ्या मुलीच्या अंगावर धावून तिला तृतीय पंथीयांनी मारहाण केल्याची घटना घडली होती.

    ठाणे, ता. 28 मे : ठाण्यात मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी तृतीयपंथीला बेदम चोप दिलाय. माजीवाड नाका येथे रस्त्यानं चालणाऱ्या मुलीच्या अंगावर धावून तिला तृतीय पंथीयांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

    मात्र तक्रार दाखल झाल्यानंतरही कारवाई झाली नाही म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी या तृतीयपंथीला बेदम चोप दिला. या तृतीयपंथीयाकडून सर्रास देहविक्री केली जात होती. त्याचबरोबर रस्त्यानं ये-जा करणाऱ्यांनाही ते लुटायचे. त्यामुळे त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. पण अशी अमानुष मारहाण करण्यापेक्षा पोलिसांनी कारवाई करणं महत्त्वाचं होतं.

    माजिवडा भागात राहणारी एक तरुणी शनिवारी रात्री कामावरुन परत येत असताना तीन-चार तृतीयपंथीयांनी तिला लुटण्याचा प्रयत्न केला. तिने याबाबत कापूरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार केली. पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.

    नंतर या संदर्भात तरुणीने मनसेकडे तक्रार केली. मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी कार्यकर्त्यांसह माजिवडा गाठत या तृतीयपंथीयांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही जण पळून गेले, तर एक तृतीयपंथी मनसे कार्यकर्त्यांच्या हाती लागला आणि त्याला बेदम मारहाण करण्यात आली.

    First published:

    Tags: MNS, Thane, Transgender, ठाणे, तृतीयपंथी, मनसे, मारहाण