Home /News /mumbai /

मनसे नेते यशवंत किल्लेदार यांचं मुंबई पोलिसांना पत्र, थेट कारवाईची मागणी

मनसे नेते यशवंत किल्लेदार यांचं मुंबई पोलिसांना पत्र, थेट कारवाईची मागणी

मनसे नेते यशवंत किल्लेदार (Yashwant Killedar) यांनी मुंबई पोलिसांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी मशिदींवर असणाऱ्या भोंग्याबाबतची तक्रार केली आहे.

मुंबई, 5 मे : मनसे नेते यशवंत किल्लेदार (MNS leader Yashwant Killedar) यांनी मुंबई पोलिसांना (Mumbai Police) पत्र पाठवलं आहे. माहीम (Mahim) विभागातील मशिदींवर संध्याकाळच्यावेळी भोंगे लावून अजाण पठण केलं जात आहे, अशा तक्रारी मनसेकडे प्राप्त झाल्या आहेत. कायद्यानुसार या मशिदींवर कारवाई करावी, अशी मागणी किल्लेदार यांनी केली आहे. मनसेकडून याबाबतचं पत्र माहीम पोलीस ठाण्याला देण्यात आलंय. 4 मे रोजी सकाळी लाऊड स्पिकरवर अजाण झाली नाही. पण संध्याकाळी स्पिकरचा वापर झाला. पुन्हा न्यायालयाच्या निर्देशाची पायमल्ली केली जात आहे. याप्रकरणी काटेकोर अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी मनसेने केली. दरम्यान, राज ठाकरे यांनी सुद्धा अजून काही मशिदींवर अजाण भोंग्यावर होते, असं म्हटलं होतं. मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी मनसेच्या भोंग्याच्या मुद्द्याबाबत असलेल्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली. भोंग्यांबाबत कायदा आहे आणि त्याचे पालन व्हावे एवढेच राज ठाकरे यांचे म्हणणे आहे. मग त्यात मशिद, मंदीर असा मुद्दा नाही. तरीही तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आदेश बघितले तर त्यात अजाण आणि भोंगे यांचा उल्लेख आहे, असं शालिनी ठाकरे म्हणाले. (घातपाताचा कट फसला; हरियाणात स्फोटकांसह चार दहशतवाद्यांना अटक) महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्र्यांना यावर भूमिका घ्यायची नाहीय. मशिदींवरचे भोंगे उतरत नाही आणि मंदीरांवरचे उतरतात, हे महाविकास आघाडीचे राजकारण आहे. मंदीरांच्या ट्रस्टवर यांचे लोक आहेत. आणि समोरुन भोंगे उतरवत आहात याचा अर्थ धर्माचे राजकारण सुरु केले आहे. आमच्यासाठी आजही हा विषय सामाजिक आहे, अशी भूमिका शालिनी ठाकरे यांनी मांडली. आम्ही काकड आरती बंद करायला सांगितलं नाही. भोंग्यावरची अजाण बंद करा असे सांगितले आहे. हा मूळ विषय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आहे, जो राज ठाकरे यांनी पुन्हा काढला. कारण त्यावर आदेश असतानाही कुणी त्याचे पालन करत नाहीय. आज सबंध देशात लोक हा विषय उचलून धरत आहे. लोक धन्यवाद देत आहेत, असं शालिनी ठाकरे म्हणाले. आम्हाला गृनिर्माण मंत्री जितेंद्र अव्हाड यांच्याशी शत्रूत्व आणि मैत्री नकोय. त्यांना मंदीरांच्या भोंग्याचे किती महत्व आहे हे आम्हाला चांगलेच माहिती आहे. त्यामुळे त्यांनी मंदीरांबद्दल बोलू नये, असा टोला शालिनी ठाकरे यांनी लगावला.
Published by:Chetan Patil
First published:

Tags: MNS

पुढील बातम्या