'जो गेला तो गेला उडत, आम्ही कोणाच्या पाया पडत नाही'; मनसे नेत्याचा घणाघाती हल्ला

'जो गेला तो गेला उडत, आम्ही कोणाच्या पाया पडत नाही'; मनसे नेत्याचा घणाघाती हल्ला

पक्षांतरामुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाल्याची चर्चा झाली. त्यानंतर या नगरसेवकांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.

  • Share this:

मुंबई, 10 जुलै : शिवसेना नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर राज्यात मोठं राजकीय नाट्य घडलं. या पक्षांतरामुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाल्याची चर्चा झाली. त्यानंतर या नगरसेवकांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. याच घडामोडीवरून मनसेचे सरसचिटणीस आणि पुणे मनपातील पक्षाचे गटनेते वसंत मोरे यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे.

'आम्ही डरकाळी फोडली आणि 5 पळून गेलेले नगरसेवक परत आले म्हणजे खूप मोठी लढाई जिंकली असे समजू नका. हा भारत देश आहे इकडे पतिव्रता असलेल्या सितामाईला ही रावणाने पळवून नेल्यानंतर जेव्हा परत आणलं गेलं तेव्हा सीतामाईलाही अग्नी परीक्षा द्यावी लागली होती...मग तुमचे नगरसेवक कुठली परीक्षा देणार ? होय मला अभिमान आहे मी राजसाहेब ठाकरेंचा नगरसेवक आहे जो गेला तो गेला उडत आम्ही कोणाच्या पाया पडत नाही,' अशी फेसबुक पोस्ट लिहित वसंत मोरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

वसंत मोरे यांनी आपल्या पोस्टमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे, ज्यामध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेनं मुंबईत मनसेच्या 6 नगरसेवकांना पक्षात घेतल्यानंतर राज यांनी टीका केली होती.

राष्ट्रवादीतून नगरसेवक पुन्हा शिवसेनेत

राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्याअहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील शिवसेनेच्या पाचही नगरसेवकांनी अवघ्या चार दिवसांत घरवापसी केली आणि सात दिवसाच्या महानाट्यावर अखेर पडदा पडला. पाचही नगरसेवकांनी 'मातोश्री'वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुन्हा शिवबंधन बांधलं.

Published by: Akshay Shitole
First published: July 10, 2020, 1:19 PM IST

ताज्या बातम्या