शिशिर शिंदे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा, शिंदेंचा मात्र इन्कार

शिशिर शिंदे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा, शिंदेंचा मात्र इन्कार

मनसेचे माजी आमदार शिशिर शिंदे शिवसेनेत गेल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. पण यात काही तथ्य नसल्याचं शिशर शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलतना स्पष्ट केलं आहे.

  • Share this:

17 मे : मनसेचे माजी आमदार शिशिर शिंदे शिवसेनेत गेल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. पण यात काही तथ्य नसल्याचं शिशर शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलतना स्पष्ट केलं आहे. शिंदे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची शनिवारी अचानक भेट झाली. त्यामुळे या चर्चांना उधान आलं आहे.

मनसेतून शिवसेनेतून गेलेले नगरसेवक दिलीप लांडे यांच्या मुलाचा लग्नसोहळा शनिवारी वांद्रे-कुर्ला संकुलात झाला. या लग्न सोहळ्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी शिशिर शिंदेही लग्न सोहळ्यात आले होते. त्यांची त्यावेळी उद्धव ठाकरेंशी भेट झाली.

उद्धव ठाकरेंसोबत झालेली ही भेट अचानक झाली असल्याचं शिशिर शिंदे यांनी सांगितलं आहे. शिशिर शिंदे यांनी मनसेच्या सर्व पदांचा राजानामा दिलां आहे. आता ते मनसेत कुठल्याच पदावर कार्यरत नाही आहेत. मुंबई महापालिका निवडणुक २०१७ च्या निकालंनर शिशिर शिंदे यांनी मनसेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता.

शिशिर शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीनंतर शिशिर शिंदे यांच्या शिवसेना प्रवेशासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. मात्र शिशिर शिंदे यांनी अशी कुठलीही शक्यता नसल्याचा खुलासा न्यूज १८ लोकमत शी बोलताना केलांय.

 

First published: May 17, 2018, 1:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading