Home /News /mumbai /

महाअधिवेशनाच्या आधी मनसे नेत्याची उद्धव ठाकरेंवर विखारी टीका

महाअधिवेशनाच्या आधी मनसे नेत्याची उद्धव ठाकरेंवर विखारी टीका

राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे.

    सागर कुलकर्णी, मुंबई, 22 जानेवारी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राज्यव्यापी महाअधिवेशन 23 रोजी होणार आहे. या अधिवेशनात मनसे नवा झेंड्यासह मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. तसंच त्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) आणि त्यांचा पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे. याचीच झलक मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर सडकून टीका करत दाखवून दिली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने मुंबई पोलिसांचं अश्वदल पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याच मुद्द्यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 'जग घोड्यावरून चांद्रयानाकडे गेलं आमचं पोलीस दल चांद्रयानाकडून घोड्यावर आलं...उद्धवा अजब तुझे सरकार', असं ट्वीट संदीप देशपांडे यांनी केलं आहे. काय आहे सरकारचा निर्णय? मुंबई पोलिसांचं अश्वदल पुन्हा सुरू करणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी केली आहे. मुंबईत पोलिसांकडे याआधी अश्वदल होतं. 1932 मध्ये हे दल बंद करण्यात आलं होतं. आता तब्बल 88 वर्षांनी हे युनिट सुरु होणार आहे. कसं असेल अश्वदल? मुंबई पोलिसांच्या या अश्वदलामध्ये 30 घोडे असणार आहेत. पेट्रोलिंग, ट्राफिकसाठी या दलाचा वापर केला जाणार आहे. 26 जानेवारीपासून हे युनिट सुरू होणार आहे. बृहन्मुंबई माउंटेड पोलीस युनिट 1 सब इन्सपेक्टर, 1 एएसआय, 4 हेडकॉन्स्टेबल, 32 कॉन्स्टेबल असणार आहेत. तसंच जमावावर नियंत्रण करण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे. घोड्यावर बसल्याने उंचीवरुन जमावावर लक्ष ठेवणे सोपे जाते. हिंसक जमावावर नियंत्रणासाठी अश्वदल महत्त्वाचं आहे, असं गृहमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. 'पवारांनी गुगली टाकून राजकारण बदलले, तुम्ही सामना बदला', सुशीलकुमार शिंदेंचा खेळाडूंना सल्ला मनसेचं महाअधिवेश, राज ठाकरेंचा एल्गार मनसेचं नवं अधिवेशन येत्या 23 तारखेला मुंबईत होणार असून त्यात मनसे कात टाकणार आहे. तब्बल 1 लाख कार्यकर्ते या मेळाव्याला येणार असल्याचा दावा मनसेकडून केला जातोय. या मेळाव्यात राज ठाकरे हे पक्षाचा नवा झेंडा जाहीर करणार आहेत. राज ठाकरेंची महाराष्ट्रधर्माची भूमिका असणार असल्याचं स्पष्ट झालंय. सततच्या अपयशाला दूर सारण्यासाठी राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वादळ निर्माण करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 23 जानेवारीला मनसेचं महाअधिवेशन मुंबईत होत असून त्यात राज ठाकरे पक्षाचं नवं धोरण जाहीर करणार आहेत. मनसेच्या राजकीय वाटचालीत हा निर्णय सर्वात महत्त्वाचा ठरणार असून मनसेला हा बदल यश मिळवून देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.सध्याच्या मनसेच्या झेंड्यात निळा, भगवा, पांढरा आणि हिरवा असे रंग आहेत तर मध्ये पक्षाचं चिन्ह असलेलं इंजिन आहे. नव्या झेंड्यात सर्व चारही रंग जाणार असून फक्त भगवा रंग असणार आहे आणि मध्यभागी 'शिवराजमुद्रा' असणार आहे. हा बदल म्हणजे मनसेची हिंदुत्वाकडे असलेली वाटचाल असल्याचं म्हटलं जात आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Mns Raj Thackeray, Uddhav thackeray

    पुढील बातम्या