मुंबई, 31 ऑक्टोबर : राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (governor bhagat singh koshyari) यांची भेट घेण्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) यांच्यावर टीका केली होती. संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत आणि राज्यपाल भेटीचा फोटो शेअर करून 'आता अपमान कोण करत आहे', असा सवालच केला आहे.
वाढीव वीज बिल आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांची दोन दिवसांपूर्वी भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीवर संजय राऊत यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना टीका केली. 'राज्यातील प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे. कोणत्या विषयाबद्दल काही प्रश्न असतील तर त्यांनी संबंधित खात्याच्या मंत्र्यांची भेट घेतली पाहिजे. त्यानंतरही जर तोडगा निघाला नाहीतर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली पाहिजे', असं सांगत राऊत यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख न करता टीका केली होती.
महाराष्ट्राचा अपमान करतांना खुद्द संजय राऊत pic.twitter.com/7K7HqD8tEl
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 31, 2020
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांच्या टीकेचा समाचार घेत एक फोटो शेअर केला आहे. शिवसेना आणि राज्यपाल यांच्यात बराच वाद पेटला होता. या वादानंतर खुद्द संजय राऊत यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली होती. या भेटी दरम्यान, संजय राऊत यांनी राज्यपालांना वाकून नमस्कार केला होता. त्यांचा हा फोटो चांगलाच चर्चेत आला होता. संदीप देशपांडे यांनी हाच फोटो ट्वीटवर शेअर करून 'महाराष्ट्राचा अपमान करतांना खुद्द संजय राऊत' असा मजकूर लिहून राऊतांना टोला लगावला आहे.
चंद्रकांत पाटलांना संजय राऊतांना टोला
दरम्यान, 'भाजपवर टीका करणं, ही शिवसेना खासदार संजय राऊत यांची ड्युटी आहे. त्यावरच त्यांचं पद आहे. मात्र, इतरांनी टीका केलेली त्यांनी चालत नाही, त्यांना लगेच टोचतं', अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर पलटवार केला.
'शरद पवारांचा सल्ला मुख्यमंत्री घेतात, हे संजय राऊतांनी मान्य केलं आहे. आम्हाला काय त्यांनी पार्थ पवारांचाही सल्ला घ्यावा, म्हणजे पवार सरकार चालवतात हे शिवसेनेनं मान्य केलं', असा सणसणीत टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MNS, Raj Thackery, Sandeep deshpande, राज ठाकरे, राज्यपाल, संजय राऊत