मनसे नेत्याचे शिवसेनेच्या मंत्र्याला जशास तसे उत्तर, विचारला थेट सवाल, म्हणाले....

येत्या सोमवारी सविनय कायदेभंग करत रेल्वेतून प्रवास करणार अशी भूमिका मनसेने घेतली आहे.

येत्या सोमवारी सविनय कायदेभंग करत रेल्वेतून प्रवास करणार अशी भूमिका मनसेने घेतली आहे.

  • Share this:
    मुंबई, 19 सप्टेंबर : राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. अशा परिस्थितीत राज्यात वाहतुकीची विस्कळलेली घडी पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य पहिवहन महामंडळाने एसटी वाहतूक सुरू केली आहे. जर एसटी बस वाहतुकीतून कोरोना वाढला तर याची जबाबदारी परिवहन मंत्री अनिल परब घेतील का? असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला. मुंबईत सर्वसामान्य चाकरमान्यांसाठी मनसेनं लोकल सेवा सुरू करावी अशी मागणी करत सविनय आंदोलन करणार अशा इशारा मनसेनं दिला होता. तिच्याच दारात त्याने घेतले पेटवून, विचारले होते शेवटचे पण... 'मनसेच्या रेल्वेतून प्रवास करण्याच्या सविनय कायदेभंगाच्या आंदोलनावर टीका करताना अनिल परब यांनी रेल्वेमुळे कोरोना वाढला तर त्याची जबाबदारी मनसे घेणार का? असा सवाल केला होता. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वक्तव्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सडकून टीका केली. एसटी बस सेवेमुळे कोरोना वाढला तर त्याची जबाबदारी मग अनिल परब घेणार का? असा प्रतिसवाल देशपांडेंनी केला. 'राज्यपालांवर दबाव होता का?' कंगना प्रकरणात काँग्रेसची घणाघाती टीका येत्या सोमवारी सविनय कायदेभंग करत रेल्वेतून प्रवास करणार अशी भूमिका मनसेने घेतली आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या आदेशानंतर राज्याअंतर्गत वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाउनच्या काळात राज्य परिवहन महामंडळाला प्रचंड तोटा सहन करावा लागला होता. त्यामुळे सहा महिन्यानंतर एसटी बसेस सुरू करण्यात आल्या आहे. आता एसटी बसेस पूर्ण आसन क्षमतेनं चालवण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हाअंतर्गत वाहतुकीचा मोठा पेच सुटला आहे.
    Published by:sachin Salve
    First published: