Home /News /mumbai /

राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र, दिला महत्त्वाचा आदेश

राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र, दिला महत्त्वाचा आदेश

गेल्या 2-3 महिन्यातील परिस्थितीत ही मन विषण्ण करणारी आहे. या कठीण प्रसंगातही महाराष्ट्र सैनिक जीवावर उदार होऊन, मोठ्या प्रमाणात पदरमोड करून लोकांच्या मदतीला धावून जात आहे.

मुंबई, 12 जून : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्याची राजधानी मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी एक पत्र लिहिले आहे. या पत्रातून राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना नवा आदेश दिला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 14 जून रोजी वाढदिवस आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पत्र लिहून महत्त्वाची सूचना आणि विनंती केली आहे.  कोरोनाच्या परिस्थतीमुळे यंदा वाढदिवस साजरा करणं अजिबात उचित नाहीये, असं म्हणत राज यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा द्यायला येऊ नये, असा आदेश दिला आहे. त्याऐवजी आहे  तिथेच जनतेला मदत करा, असा आदेश देणारं जाहीर पत्रच कार्यकर्त्यांना उद्देशून राज यांनी लिहिलं आहे. हेही वाचा - राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणाले की, 'कोरोनामुळे यंदा वेगळी परिस्थिती आहे. सर्वत्र चिंतेचे वातावरण असताना वाढदिवस साजरा करणं अजिबात उचित नाही. महाराष्ट्र सैनिकांना माझ्या सूचनावजा आदेश आहे की, कोणीही मला शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथेच जनतेला मदत करा, दिलासा द्या. ह्याच माझ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत.' तसंच, ' गेल्या 2-3 महिन्यातील परिस्थितीत ही मन विषण्ण करणारी आहे. या कठीण प्रसंगातही महाराष्ट्र सैनिक जीवावर उदार होऊन, मोठ्या प्रमाणात पदरमोड करून लोकांच्या मदतीला धावून जात आहे. माझ्या सैनिकांच्या बातम्या माझ्यापर्यंत पोहोचल्या आणि त्या ऐकताना मला आनंद आणि अभिमान दोन्हीही वाटत रहायचा. मी भाग्यवान आहे की, मला तुमच्या सारखे सहकारी मिळाले. कार्यकर्त्यांनी आपला स्वत:चा आणि कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालून जे कार्य केले आहे, त्याला माझा सलाम आहे' अशी भावनाही राज ठाकरेंनी व्यक्त केली. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: MNS

पुढील बातम्या