सत्ता स्थापनेचा 'पॉवर गेम' राज ठाकरे आणि शरद पवारांमध्ये खलबतं

काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा देणार नाही असं स्पष्ट केल्यानंतरही पडद्यामागून मोठ्या हालचाली सुरू आहेत.

News18 Lokmat | Updated On: Nov 2, 2019 09:05 PM IST

सत्ता स्थापनेचा 'पॉवर गेम' राज ठाकरे आणि शरद पवारांमध्ये खलबतं

मुंबई 2 नोव्हेंबर : भाजप आणि शिवसेनेच सत्तास्थापनेच्या वाटणीवरून बिनसल्याने राज्यात आता 'पॉवर गेम'ला सुरूवात झालीय. भाजप आणि सेनेचं जमलच नाही तर काय करायचं यावर अनेक शक्यतांचा विचार केला जातोय. काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा देणार नाही असं स्पष्ट केल्यानंतरही पडद्यामागून मोठ्या हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उद्या म्हणजे रविवारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीत जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. राज ठाकरे संध्याकाळच्या सुमारास शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले आणि राज्यातल्या राजकीय स्थितीवर चर्चा केली. ही भेट 10 मिनिटं चालली. मनसेचा 1 आमदार निवडून आल्याने अटी-तटीच्या परिस्थितीत त्या एका आमदारालाही महत्त्व येवू शकते. विधानसभा निवडणुका मनसेनं स्वतंत्रपणे लढविल्या तरी काँग्रेस-राष्ट्रवादीशी अनेक ठिकाणी मैत्रिपूर्ण लढती केल्या होत्या.

दबावाचं राजकारण

सत्ता स्थापनेला उशीर होत असल्याने शिवसेना भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतेय. त्या प्रयत्नांचाच भाग म्हणून राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देणार का अशी चर्चा सुरू आहे. मात्र राष्ट्रवादीला जनमतात बसण्याचा कौल मिळाला असून  ज्यांना जनतेने कौल दिला त्यांनी सरकार स्थापन करावं असं मत राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केलं. राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या दबावाच्या प्रयत्नांना धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी  आणि शिवसेना एकत्र येवून भाजपला चेकमेट देऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली जातेय. मात्र शुक्रवारी सोनिया गांधींनीच शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता फेटाळून लावली तर राष्ट्रवादीही शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता दिसत नाहीये. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनीही शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता फेटाळली होती.

कोंडी फोडण्यासाठी भाजप-शिवसेना आज पहिल्यांदाच बसणार आमनेसामने?

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने केलेली 10 हजार कोटींच्या मदतीची घोषणा अपुरी असून सरकारने काय थट्टा चालवली आहे का असा सवलाही त्यांनी केला. दरम्यान, भाजप-शिवसेनेमध्ये सत्तावाटपासाठी निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी आज भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे. रात्री ही बैठक होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केलीय. त्याबाबतचा एक प्रस्ताव भाजपने शिवसेनेला दिलाय. निकालानंतर गेल्या आठ दिवसांपासून दोन्ही पक्षांमध्ये कोंडी निर्माण झालीय. महायुतीला बहुमत मिळूनही सत्तेत जास्तीत जास्त वाटा मिळावा यासाठी शिवसेना दबावाचा प्रयत्न करतंय. तर भाजप मुख्यमंत्रिपदावर ठाम आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान युती करताना जे ठरलं होतं त्यानुसारच सत्तावाटप व्हावं अशी शिवसेनेची मागणी आहे.

Loading...

स्थापन होताच सरकार येणार धोक्यात, सट्टाबाजारातील अंदाजाने खळबळ

त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्यावेळी युती करताना नेमकं काय ठरलं होतं याची चर्चा करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी भेटावं असा भाजपचा प्रस्ताव आहे. त्यामुळे ही भेट होण्याची शक्यता व्यक्त केलीय जातेय. कुठल्याही परिस्थितीत अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद पाहिजे अशी शिवसेनेची मागणी आहे तर पूर्ण पाच वर्ष मुख्यमंत्रिपद आपल्याकडेच ठेवण्यावर भाजपचा जोर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2019 08:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...