मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'मनपाचं चेक द व्हायरस नाही मनी विथ व्हायरस', मनसेचा पत्रकार परिषदेतून गंभीर आरोप

'मनपाचं चेक द व्हायरस नाही मनी विथ व्हायरस', मनसेचा पत्रकार परिषदेतून गंभीर आरोप

कोविड चाचण्यांसदर्भात आरोप करत मुंबई मनपाचा अनागोंदी कारभार सुरू आहे. चेस द व्हायरस आहे की मेक मनी विथ व्हायरस आहे ? अशी गंभीर टीका मनसेनं पत्रकार परिषदेत केली आहे.

कोविड चाचण्यांसदर्भात आरोप करत मुंबई मनपाचा अनागोंदी कारभार सुरू आहे. चेस द व्हायरस आहे की मेक मनी विथ व्हायरस आहे ? अशी गंभीर टीका मनसेनं पत्रकार परिषदेत केली आहे.

कोविड चाचण्यांसदर्भात आरोप करत मुंबई मनपाचा अनागोंदी कारभार सुरू आहे. चेस द व्हायरस आहे की मेक मनी विथ व्हायरस आहे ? अशी गंभीर टीका मनसेनं पत्रकार परिषदेत केली आहे.

मुंबई, 21 ऑगस्ट : कोविड चाचण्यांमध्ये गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याचा पर्दाफाश करणार असल्याचं म्हटलं आहे. आज पक्षाचे नेते अविनाश अभ्यंकर आणि नयन कदम यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेत पालिकेच्या कामावर आणि आघाडी सरकारवर टीका केली आहे. कोविड चाचण्यांसदर्भात आरोप करत मुंबई मनपाचा अनागोंदी कारभार सुरू आहे. चेस द व्हायरस आहे की मेक मनी विथ व्हायरस आहे ? अशी गंभीर टीका मनसेनं पत्रकार परिषदेत केली आहे. कोविडच्या विषयावरुन मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. काल कोविड सेंटरचं कंत्राट महपौर किशोरी पेडणेकर यांचा मुलगा साईप्रसाद पेडणेकर याला नियमबाह्य पद्धतीने देण्यात आलं असल्याचा आरोप पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला होता. यावर महापौरांनी या प्रकरणी राजीनामा देण्याची मागणी पक्षातर्फे करण्यात आली आहे. तर पेडणेकर यांनी या आरोपांना फेटाळत आपल्या मुलाला नियमाप्रमाणेच काम मिळालं आहे असं उत्तर दिलं आहे. पण यावर आजही पत्रकार परिषदेत टीका करण्यात आली आहे. अँटिजन टेस्ट या बंद कराव्यात अशी मागणी यावेळी मनसेकडून करण्यात आली तर मनपाने पालिकेच्या कारभारावर टीका केली आहे. मनपाने गुंजानी कुटुंबीयांना आधी सांगितलं की तुम्ही पॉझिटिव्ह आहात आणि नंतर त्यांना निगेटिव्ह असल्याची माहिती दिली हे चुकीचं असल्याचं मनसेनं म्हटलं आहे. सात मुलींच्या खांद्यावर आईची अंत्ययात्रा, हा फोटो खूप काही सांगून जातो! मनसेच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे - मुंबई मनपाचा अनागोंदी कारभार सुरु आहे - चेक द व्हायरस आहे की मेक मनी विथ व्हायरस आहे ? - दहिसर नाक्यावर किंवा इतर ठिकाणी असलेली कोविड सेंटर्स भरण्याकरता लोकांना त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आहे असं सांगितलं जातंय का ? मनसेचा सवाल - आता पत्रकार परिषदा होणार नाहीत मनसे पद्धतीने समाचार घेणार - मनपाला उखळ पांढरं करण्यासाठी या अँटिजन टेस्ट केल्या जातायंत का ? कोरोनाच्या कॉलर ट्यूनवर मनसे नेता भडकले, ट्वीट करून म्हणाले... - या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहोत, महापौरांनाही पत्र लिहिणार आहोत - जे कराल ते योग्य करा, जर अँटिजन टेस्ट योग्य नसतील त्या थांबवा - जर जग कौतुक करत असेल तर मग बेस्ट सुरु करा, निर्बंध काढा कुटुंबाच्या हट्टामुळे 2 दिवस तरुणाचा मृतदेह पडून, लघवी करण्यावरून केला होता खून - अँटिजन टेस्ट बंद करा - आम्ही राजकारण करत नाहीयोत पण एखादा मुद्दा समोर आणणं म्हणजे राजकारण नव्हे - या प्रकरणी संबंधित मनपा अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
First published:

Tags: Corona, Coronavirus, Mumbai police

पुढील बातम्या