मुंबई, 19 नोव्हेंबर : मुंबईत मराठी पाट्या आणि पाकिस्तानी कलाकारांविरोधात आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) आता 'कराची स्वीट्स' (karachi sweets) नावाने मिठाईचे दुकान चालवणाऱ्यांना दणका दिला आहे. मनसेचे राज्य उपाध्यक्ष हाजी सैफ शेख यांनी या दुकान चालकाला थेट न्यायालयात खेचणार आहे. त्याबद्दल नोटीसही कराची स्वीट्स व्यवस्थापकांना पाठवली आहे.
मुंबईत कराची स्वीट्स नावाने दुकानं सुरू असल्याचे निर्दशनास आल्यानंतर मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. 'देशाचा पारंपारिक शत्रू असलेल्या पाकिस्तानची राजधानी कराची या नावाने बहुचर्चित 'कराची स्वीट्स' या नावाचा आधार घेऊन मिठाईचे दुकान सुरू केले आहे. त्यामुळे भारतीयांच्या राष्ट्रवादाला ठेचू पोहोचून हा व्यवसाय केला जात आहे', असा आक्षेप मनसेचे नेते हाजी सैफ शेख यांनी घेतला आहे.
या प्रकाराबद्दल हाजी शेख यांनी कराची व्यवस्थापनाला एक पत्र लिहून तात्काळ नाव हटवण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर एक कायदेशीर नोटीस सुद्धा हैदराबाद येथील कराची स्वीट्स व्यवस्थापकांना देण्यात आली आहे.
कराची स्वीट्स ला बसणार मनसे दणका! 👊👊
मुंबईतील 'कराची स्वीट्स' नावाच्या अस्थापने विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष श्री. हाजी सैफ शेख आक्रमक, संबंधित अस्थापनाला न्यायालयात खेचणार!#RajThackeray #HajiSaifShaikh #मनसेदणका #MNS pic.twitter.com/ZhhuCjh0s0
— akbarspathan (@AKBARSPATHAN2) November 18, 2020
जम्मू काश्मीरमध्ये आजपर्यंत अनेकवेळा हिंसाचार झाला आहे. दहशतवाद्याची मोठा आधार म्हणून पाकिस्तानने तिथल्या हिंसाचाराला चिथावणी दिली आणि पाठिंबा दर्शवला. पाकिस्तान आपल्या सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमेवर गोळीबार केला आहे, आपले जवान यात शहीद झाले आहे, त्यामुळे अशा देशाच्या राजधानी असलेल्या कराची नावाने महाराष्ट्रात व्यवसाय खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही मनसेनं दिला आहे.
वीज बिलासाठी मनसे आंदोलनाच्या तयारीत
दरम्यान,लॉकडाउनच्या काळात आलेल्या भरमसाठ वीज बिलात सवलत देण्यास ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी नकार दिल्यामुळे मनसेनंही आक्रमक भूमिका घेतली आहे. "लाथो के भूत बातों से नही मानते" म्हणत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकारविरोधात आक्रमकपणे हल्ला चढवला आहे. आता वीज बिलात सवलत देण्यासाठी देशपांडे यांनी ट्वीट करून ठाकरे सरकारला थेट इशाराच दिला आहे.
LVB च्या ग्राहकांना दिलासा! ठेवीदारांची परतफेड करण्याइतकी रक्कम बँकेकडे उपलब्ध
'वीज बिला संदर्भात निवेदन, अर्ज, बैठका, विनवण्या सगळं झालं. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल कारण"लाथो के भूत बातों से नही मानते" असं म्हणत देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
वीज बिला संदर्भात निवेदन, अर्ज, बैठका, विनवण्या सगळं झालं. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल कारण"लाथो के भूत बातों से नही मानते"
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) November 19, 2020
विशेष म्हणजे, आज वाढीव वीज बिलासंदर्भात मनसेनं आज बैठक बोलावली आहे. मुंबईतील पक्ष कार्यालयात दुपारी 2 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत वीज बिलासंदर्भात आंदोलनाची रणनीती आखली जाणार आहे.