Home /News /mumbai /

VIDEO : राज ठाकरेंच्या नादाला लागू नका, मनसे नेत्यानं भरला MIM च्या खासदाराला दम

VIDEO : राज ठाकरेंच्या नादाला लागू नका, मनसे नेत्यानं भरला MIM च्या खासदाराला दम

'आमच्या अंगावर येऊ नका, अंगावर आला तर शिंगावर घेऊ, प्रयत्न करून तर बघा मग तुम्हाला कळेल. आमच्या नादाला लागण्याच्या फंद्यात पडू नका'

    मुंबई, 25 जानेवारी : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाची भूमिका जाहीर केल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली होती. त्यांच्या टीकेला उत्तर देत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सज्जड दम भरला आहे. 'इम्तियाज जलील चुकून लॉटरी लागल्यामुळे तुम्ही खासदार झाला आहात हे आधी लक्ष्यात ठेवा. त्यामुळे या महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या नादाला लागू नका, आताच सांगून ठेवतो. पाहिजे तर अबू आझमी यांना विचारून बघा. तुमचे ओवेसी औरंगाबादमध्ये नाचले होते, त्यांना आम्ही नाच्या म्हणू का?' असा सणसणीत टोला नांदगावकर यांनी लगावला. 'आमच्या अंगावर येऊ नका, अंगावर आला तर शिंगावर घेऊ, प्रयत्न करून तर बघा मग तुम्हाला कळेल. आमच्या नादाला लागण्याच्या फंद्यात पडू नका, नाहीतर खूप महागात पडेल. हैदराबादवरून आला आहात, हैदराबादरमध्येच राहा. इकडे नाय ती नाटकं करायची नाही. राज ठाकरे यांच्याविषयी परत काही बोलला तर अडचणीचे ठरेल', असा इशाराही नांदगावकर यांनी दिला. काय म्हणाले होते जलील? राज ठाकरे यांनी मनसेच्या महाअधिवेशनामध्ये मशिदीवरील भोंग्यावरून आक्षेप घेत टीका केली होती. त्यांच्या या विधानावरून 'मशिदीवरुन भोंगे काढण्यासाठीही कायदा आणा. राज ठाकरे इतके वर्ष काय करत होते. त्यांना आताच भोंगे का काढावेसे वाटत आहेत?' असा सवाल करत  इम्तियाज जलील यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. तसंच 'नागरिकत्व सुधारणा कायदा आणला आहे. मुसलमानांनी येथे राहिचे का नाही असं वातावरण केलं आहे. मशिदीवरुन भोंगे काढण्यासाठीही कायदा आणा. काही पुढाऱ्यांना वाटते जनतेला काही काळात नाही. हेच महाशय 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध बोलत होते. या दोन तीन महिन्यात काय झाले माहीत नाही. आताच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांचा निर्णय झाला आहे. त्यामुळे झेंडा बदलला आहे. असे लोक येणार जाणार. पण देश संविधानावर चालतो,' असं म्हणत जलील यांनी मनसेवर जोरदार टीका केली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: MNS, Mumbai, Raj Thackery

    पुढील बातम्या