Home /News /mumbai /

अमित ठाकरेंचा मेट्रोच्या आरे कारशेडला विरोध, मनसे-भाजप आमनेसामने येणार?

अमित ठाकरेंचा मेट्रोच्या आरे कारशेडला विरोध, मनसे-भाजप आमनेसामने येणार?

मेट्रोचं कारशेड हे आरे कॉलनीतच बनावं यासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. पण आरे कॉलनीत मेट्रो कारशेड उभारण्यास पर्यावरण प्रेमींचा विरोध आहे. विशेषत: मनसेचे तरुण तडफदार नेते अमित ठाकरे यांचादेखील विरोध आहे.

    मुंबई, 2 जुलै : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (knath Shinde) यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आता नवं सरकार स्थापन झालं आहे. या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर लगेच आता मेट्रो कारशेडचा मुद्दा चर्चेत आला आहे. कारण नव्या सरकारच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना मेट्रो कारशेडसाठी कोर्टात खमकी बाजू मांडण्यासाठी तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. मेट्रोचं कारशेड हे आरे कॉलनीतच (Aarey Clooney) बनावं यासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. पण आरे कॉलनीत मेट्रो कारशेड उभारण्यास पर्यावरण प्रेमींचा विरोध आहे. विशेषत: मनसेचे तरुण तडफदार नेते अमित ठाकरे यांचादेखील विरोध आहे. पण फडणवीस आरे कारशेडसाठी आग्रही राहिल्यास भविष्यात मनसे विरुद्ध भाजप असाही संघर्ष बघायला मिळू शकतो. विशेष म्हणजे मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आरे कारशेडवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात खरंच फडणवीस जातात का आणि त्याचे परिणाम काय होतात, हे पुढच्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलंच. त्याआधी अमित ठाकरेंनी आज मांडलेली भूमिका महत्त्वाची आहे. अमित ठाकरे नेमकं काय म्हणाले? अमित ठाकरे यांनी फेसबुकवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी मेट्रोचं कारशेड आरेत बनवण्याबाबत आपली भूमिका मांडली आहे. "मेट्रो कारशेड आरे जंगलात करण्याचा नव्या सरकारने घेतलेला निर्णय माझ्यासारख्या असंख्य पर्यावरणप्रेमींसाठी धक्कादायक आहे. आरेमध्ये कारशेड होऊ नये म्हणून शेकडो तरुण-तरुणींनी संघर्ष केला होता. काहींना तर पोलिसांनी गजाआड टाकलं होतं", असं अमित ठाकरे म्हणाले आहेत. (विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सुनील प्रभूंचा व्हीप जारी, आवाजी मतदान, कारवाईची टांगती तलवार, बंडखोरांचं काय होणार?) "आपल्याला विकास हवाच आहे, पण पर्यावरणाचा बळी देऊन नको. आपलं पर्यावरण उद्धवस्त झालं तर भविष्यात राजकारण करायला माणूस नावाचा प्राणी शिल्लकच राहणार नाही, याचं भान सर्व राजकीय नेत्यांनी बाळगायला हवं. नवे मुख्यमंत्री आणि नवे उपमुख्यमंत्री यांनी आरेतील मेट्रो कारशेडबाबतच्या आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, ही आग्रहाची विनंती", अशी भूमिका अमित ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. ठाकरे सरकारने उचलबांगडी केलेल्या अश्विनी भिडे यांना पुन्हा मेट्रोची जबादारी मिळणार? विशेष म्हणजे मेट्रोचं कारशेड आरे कॉलनीत उभारण्यात यावं यासाठी आता फडणवीस यांनी रणनीती आखल्याची चर्चा आहे. देवेंद्र फडणवीस मेट्रो 3 प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी आयएएस अधिकारी अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांची पुन्हा नियुक्ती करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अश्विनी भिडे यांची पुन्हा मेट्रो 3 च्या व्यावस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केली तर हा शिवसेनेसाठी देखील धक्का मानला जाऊ शकतो, अशी चर्चा आता रंगली आहे. मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाची धुरा आहे त्यांच्यावरच असणार की दुसरं कुणाकडे सोपवलं जाणार याबाबत विविध चर्चा सुरु आहेत. पण वरिष्ठ सूत्रांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाची धुरा सांभाळण्यासाठी पुन्हा एकदा अश्विनी भिडे यांची वर्णी लागू शकते. कारण मेट्रो 3चं काम हे सुरुवातीपासून त्यांच्याकडे होतं. मग काम करत असताना अनेक अडथळ्यांना त्या सामोरे गेल्या. जमीन अधिग्रहन, तसेच अनेक सोसायट्यांची जमीन घेण्यासाठी प्रयत्न, याशिवाय आरे कारशेडला झालेला प्रचंड विरोध या सगळ्या घडामोडींदरम्यान भिडे यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यांनी विरोधकांचा विरोध दडपून काढण्यासाठीदेखील प्रयत्न केले होते. त्यामुळे मेट्रोचं काम पुन्हा गतीने होण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारला त्यांच्या नेतृत्वाची गरज लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर मेट्रोची पुन्हा जबाबदारी दिली जावू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या