Home /News /mumbai /

'महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे हे 3 आवडते 'उद्योग'; पुण्यातील घटनेनंतर अमित ठाकरेंही संतापले

'महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे हे 3 आवडते 'उद्योग'; पुण्यातील घटनेनंतर अमित ठाकरेंही संतापले

अमित ठाकरेंनी सांगितलं MPSC च्या विद्यार्थ्यांचं होणाऱ्या नुकसानाचं नेमकं कारण...

    मुंबई, 4 जुलै : पुण्यातील (Pune) होतकरू विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. 'एमपीएससी'ची (Pune MPSC Student Suicide) परीक्षा प्रक्रिया रखडल्यामुळे स्वप्नील लोणकर या हुशार तरुणाने आत्महत्या केली आणि मृत्यूपूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. 24 वर्षीय स्वप्निल लोणकर यानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (suicide)केल्यानं एकच खळबळ उडाली. पुण्यातल्या फुरसुंगी परिसरात ही घटना घडली. स्वप्निलनं अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. त्यात तो पास देखील झाला होता. मात्र यानंतरही त्याला नोकरी मिळाली नाही आणि याच नैराश्यातून त्यानं हे धक्कादायक पाऊल उचललं आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सुपूत्र अमित ठाकरे यांनीही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. अमित ठाकरे (Amit Thackeray On Social Media) यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. परीक्षा दिरंगाई, निकाल दिरंगाई आणि नियुक्ती दिरंगाई हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे तीन आवडते उद्योग आहेत, असाही टोला त्यांनी यावेळी लगावला. काय म्हणले अमित ठाकरे.. 'एमपीएससी'ची परीक्षा प्रक्रिया रखडल्यामुळे स्वप्नील लोणकर या हुशार तरुणाने आत्महत्या केल्यामुळे अवघा महाराष्ट्र हळहळत आहे. भरपूर अभ्यास करून प्रशासकीय अधिकारी बनून महाराष्ट्राची सेवा करू इच्छिणारा स्वप्नीलसारखा एक संवेदनशील तरुण जर 'एमपीएससी हे मायाजाल आहे' असं म्हणत आत्महत्या करत असेल, तर त्याच्या या म्हणण्याला सर्वांनीच अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे. हे ही वाचा-माझा तळतळाट लागेल, एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी' परीक्षा दिरंगाई, निकाल दिरंगाई आणि नियुक्ती दिरंगाई हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे तीन आवडते उद्योग आहेत आणि त्यामुळे गेली अनेक वर्षं लाखो तरुण-तरुणींच्या आयुष्याचे कधीही भरुन न येणारे नुकसान होत आहे. साहजिकच 'एमपीएससी' परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये संताप खदखदत आहे. स्वप्नीलच्या दुर्दैवी घटनेतून महाराष्ट्र लोकसेवा आयोग योग्य तो बोध घेईल आणि आपला 'दिरंगाईचा खेळ' कायमचा थांबवेल, हीच अपेक्षा. MPSC परीक्षेच्या निकालावरून रोहित पवारांचा सरकारला घरचा अहेर एमपीएससी परीक्षा आणि निकालाच्या दिरंगाई वरून आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. रोहित पवार यांनी ट्वीट करून राज्य सरकारला विनंती केली आहे. कोरोनामुळं स्थगित केलेली #MPSC ची परीक्षा आणि प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळं युवा पिढी नैराश्यात आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन ही परीक्षा त्वरित घेण्यात यावी आणि प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: MNS, Mpsc examination, Pune, Suicide

    पुढील बातम्या