मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मनसेसैनिकांनी थेट 'मातोश्री'समोरच फोडली हंडी, LIVE VIDEO

मनसेसैनिकांनी थेट 'मातोश्री'समोरच फोडली हंडी, LIVE VIDEO

आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवास्थान असलेल्या मातोश्री बंगल्याच्या समोर मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी दहीहंडी फोडली.

आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवास्थान असलेल्या मातोश्री बंगल्याच्या समोर मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी दहीहंडी फोडली.

आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवास्थान असलेल्या मातोश्री बंगल्याच्या समोर मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी दहीहंडी फोडली.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 31 ऑगस्ट : कोरोनाची (corona cases) तिसरी लाट येण्याची भीती असल्यामुळे राज्य सरकारकडून (mva government) दहीहंडी उत्सवास (dahihandi 2021) मनाई करण्यात आली होती. पण, मनसेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी दहीहंडी फोडून सरकारचा निषेध केला आहे. मनसेसैनिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्या मातोश्री (matoshri) निवास्थानाबाहेरच हंडी फोडली आहे.

मनसे सैनिकांनी रात्रापासून ठिकठिकाणी दहीहंडी फोडून सरकारचा निषेध केला.  ठाण्यात जन्माष्टमीचे (Janmashtami) औचित्य साधून मनसैनिकांनी अनेक ठिकाणी दहीहंडी फोडली.  त्यानंतर आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवास्थान असलेल्या मातोश्री बंगल्याच्या समोर मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी दहीहंडी फोडली. मनसेच्या कार्यकर्त्याने अखिल चित्रे यांना खांद्यावर बसवलं आणि हंडी फोडली. त्यानंतर घोषणाबाजी करून कार्यकर्ते निघून गेले.

तर दुसरीकडे, ठाण्यातील वर्तकनगर येथील लक्ष्मी पार्क चौकात मनविसेचे जिल्हाप्रमुख संदिप पाचंगे आणि मनसैनिकांनी दहिहंडी लावून मानवी मनोरे लावून दहीहंडी फोडून मनसेचा झेंडा हातात घेवून सरकार विरोधात घोषणाबाजी केली. तर ठाण्यातील नौपाडा येथील मनसेचे मुख्य कार्यालय येथे देखील मनसैनिकांनी दहीहंडी फोडली. अशा प्रकारे अनेक ठिकाणी दहीहंडी फोडून मनसेने आपला सराकार विरोधात निषेध नोंदवला. तर पोलिसांनी रात्रीच अनेक मनसैनिकांची धरपकड सुरु केल्याने कार्यकर्त्यांची रात्रभर पळापळ सुरु होती.

मनसे करणार आता घंटानाद आंदोलन

तर दुसरीकडे, 'सर्व सण-उत्सव साजरे झालेच पाहिजे, तुम्हाला नियम लावायचे आहेत ना? मग सर्वांना नियम एक लावा. प्रत्येकासाठी नियम वेगळा असं करुन चालणार नाही. सरकार सोयीनुसार निर्बंध लावत आहे. हे घराच्या बाहेर पडण्यासाठी घाबरतात तर त्यात आमचा काय दोष? असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थित केला.

मुख्यमंत्र्यांनी भाजप-मनसेला फटकारलं, आशीर्वाद कशाला जनतेचा जीव धोक्यात घालायला?

'लॅाकडाऊन आवडे सरकारला अशी परिस्थिती आहे. इतर सर्व गोष्टी सुरू आहे परंतु दुसरी, तिसरी लाट सांगत घाबरवले जातंय. फक्त महाराष्ट्रात मुंबईत नियम का? जनआशीर्वाद चालते. सणांच्या वेळी कोरोना पसरतो? मंदिरे उघडली नाहीत तर मनसे घंटानाद आंदोलन करणार असल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

First published: