Home /News /mumbai /

मनसेला धक्का! BMC निवडणुकीसाठी शिवसेनेची जोरदार मोर्चेबांधणी, शिरोडकरांनी बांधले शिवबंधन

मनसेला धक्का! BMC निवडणुकीसाठी शिवसेनेची जोरदार मोर्चेबांधणी, शिरोडकरांनी बांधले शिवबंधन

मुंबई महापालिका निवडणुका (BMC Elections) काही महिन्यांवर आल्या असल्याचे संकेत मिळायला सुरुवात झाली आहे. मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि मनसेचे सरचिटणीस आदित्य शिरोडकर (Aditya Shirodkar) यांनी शुक्रवारी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला.

पुढे वाचा ...
    मुंबई, 16 जुलै : मुंबई महापालिका निवडणुका (BMC Elections) काही महिन्यांवर आल्या असल्याचे संकेत मिळायला सुरुवात झाली आहे. मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि मनसेचे सरचिटणीस आदित्य शिरोडकर (Aditya Shirodkar) यांनी शुक्रवारी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackray) यांच्या हस्ते शिवबंधन बांधून त्यांनी पक्षात अधिकृत प्रवेश केला. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackray) आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई (Varun sardesai) उपस्थित होते. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकण्याचं मोठं आव्हान सध्या शिवसेनेसमोर आहे. विशेषतः 2019 मध्ये भाजपसोबत ताटातूट झाल्यानंतर शिवसेनेसमोरचं आव्हान वाढलं आहे. एकट्याच्या जिवावर निवडणुका जिंकणं आणि वर्षानुवर्षं सत्ता असल्यामुळे अँटि इन्कम्बन्सीचा सामना करणं, अशी दोन्ही आव्हानं शिवसेनेला पेलावी लागणार आहेत. इनकमिंग सुरू शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे मनसेसाठी हिंदुत्ववादी पक्षाची स्पेस तयार झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. त्यासाठी पक्षानं त्यांचा झेंडादेखील बदलल्याची चर्चा होती. ही स्पेस मनसेला मिळणार की नाही, याची उलटसुलट चर्चा होत असताना मनसेतील एक महत्त्वाचा चेहरा शिवसेनेत दाखल झाला आहे. शिवसेनेसाठी ही जमेची बाजू असून मुंबईतील युवक संघटनेवर पकड असणारा नेते पक्षात दाखल झाल्यामुळे शिवसेनेला याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. हे वाचा -Anil Deshmukh: अनिल देशमुखांना मोठा झटका; कोट्यवधींची संपत्ती ED ने केली जप्त बदललेली समीकरणं शिवसेनेनं महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेणं, हे मुंबईकरांना फारसं आवडलं नसल्याचा एक निष्कर्ष काही महिन्यांपूर्वी समोर आला होता. शिवसेनेनं केलेल्या अंतर्गत सर्व्हेमधून हा निष्कर्ष पुढं आल्याचं सांगितलं जात होतं. त्यानंतर शिवसेनेनं आपली काही धोरणं बदलल्याचीदेखील चर्चा होती. आता प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत हा आयाराम-गयारामचा सिलसिला सुरुच राहिल, अशी चिन्हे आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: BMC, MNS, Shivsena

    पुढील बातम्या