...तर मिकाला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, मनसेचा इशारा

...तर मिकाला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, मनसेचा इशारा

' 15 आॅगस्ट को हमारा हिंदुस्थान आजाद हुआ और 14 आॅगस्ट को हमारा पाकिस्तान', मिकाच्या या 'हमारा पाकिस्तान'वर सगळीकडून टीका होतेय.

  • Share this:

04 आॅगस्ट :  गायक मिका सिंग स्वातंत्र्य दिनानिमित्त अमेरिकेत होणाऱ्या कार्यक्रमात आपला परफाॅर्मन्स सादर करणार आहे. 12 आणि 13 आॅगस्ट रोजी होणारा हा कार्यक्रम भारत आणि पाकिस्तानाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आहे. याबद्दल मिकानं केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय, ' 15 आॅगस्ट को हमारा हिंदुस्थान आजाद हुआ और 14 आॅगस्ट को हमारा पाकिस्तान', मिकाच्या या 'हमारा पाकिस्तान'वर सगळीकडून टीका होतेय.

या कार्यक्रमात मिका सिंग पाकिस्तानचे गोडवे गाणार, याचा सगळीकडे निषेध होतोय. यावर मनसे चित्रपट अध्यक्ष अमेय खोपकर IBNलोकमतशी बोलताना म्हणाले, ' अमेरिकेतला कार्यक्रम पाकिस्तानातला आयोजक करतोय. मिकाला लाज कशी वाटत नाही? आम्ही मिकाला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही.मिकाने मुंबईत परतून हातात माईक धरून दाखवावा.'

हा पाहा मिकाचा वादग्रस्त व्हिडिओ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 4, 2017 11:57 AM IST

ताज्या बातम्या