Home /News /mumbai /

संजय राऊतांनी राज ठाकरेंना दिली 'टाळी', पण मनसेनं लगावला टोला

संजय राऊतांनी राज ठाकरेंना दिली 'टाळी', पण मनसेनं लगावला टोला

रातोरात जेव्हा मनसेचे नगरसेवक पळवले त्यावेळेस शिवसेनेनं काय केले? पाक कलाकार विरोध मनसेने आंदोलन केले, त्यावेळेस सेना कुठे होती?

    मुंबई, 13 सप्टेंबर : मुंबईच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि अभिनेत्री कंगना राणावत वाद पेटला आहे. या वादात मुंबईत ठाकरे ब्रँड टिकवला पाहिजे, अशी भूमिका मांडत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना टाळी दिली होती. पण, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राऊतांवर पलटवार केला आहे. रातोरात जेव्हा मनसेचे  नगरसेवक पळवले त्यावेळेस शिवसेनेनं काय केले? पाक कलाकार विरोध मनसेने  आंदोलन केले, त्यावेळेस सेना कुठे होती आणि ठाकरे ब्रँड संभाळण्यास राज  ठाकरे हे समर्थ आहे, असा सणसणीत टोला देशपांडे यांनी संजय राऊतांना लगावला. तसंच, शिवसेनेला अखेर आठवण झाली. ज्यावेळेस मराठी माणसासाठी, मुंबईसाठी मनसे लढत होती पण त्यावेळेस सेना खासदार मुग गिळून का बसले होते. दोन्ही ठाकरे एकत्र यावे अशी भूमिका आम्ही मराठी माणसासासाठी घेतली होती. त्यावेळेस सेनेनं कोणतीच भूमिका घेतली नाही, अशी आठवणही  संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला करून दिली. काय म्हणाले होते राऊत? '‘ठाकरे’ हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. दुसरा महत्त्वाचा ‘ब्रॅण्ड’ पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रॅण्डनाच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे’ ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल' अशी चिंताही राऊतांनी व्यक्त केली.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: MNS, Raj Thackery, Sandeep deshpande, मनसे, संदीप देशपांडे

    पुढील बातम्या