राज ठाकरेंची चौकशी करणाऱ्या EDला 'मनसे'ची नोटीस!

'मनसे' आता सक्तवसुली संचालनालयाला म्हणजेच EDला मराठी भाषेचे धडे देणार आहे. अन तेही कायदेशीर मार्गाने.

News18 Lokmat | Updated On: Aug 23, 2019 07:42 PM IST

राज ठाकरेंची चौकशी करणाऱ्या EDला 'मनसे'ची नोटीस!

मुंबई 23 ऑगस्ट : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची चौकशी करणाऱ्या EDलाच 'मनसे'ने आता नोटीस पाठवलीय. ईडीच्या कार्यालयावर असलेले फलक हे हिंदी आणि इंग्रजीत आहेत. ते मराठीत असायला पाहिजे असं म्हणत 'मनसे'ने जिल्हाधिकाऱ्यांकडे याची तक्रार केलीय. महाराष्ट्रात असलेल्या सरकारी कार्यालयांवरचे फलक हे मराठीतच पाहिजे असा नियम आहे. त्यामुळे 'मनसे'ने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करत त्याची प्रत ईडीला पाठवलीय. आता राज्याच्या मराठी भाषा विभागाने त्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी 'मनसे'ने केलीय.

'मनसे'ने याआधीही मराठी फलकांसाठी मुंबईत जोरदार आंदोलन केलं होतं. हे आंदोलन खास 'मनसे' स्टाईल झाल्याने अनेक दुकानं आणि आस्थापनांच्या पाट्या बदलल्या होत्या. ईडी सरकारच्या निर्देशानुसार कारवाई करत असल्याचा आरोप मनसेने केला होता. त्या पार्श्वभूमीवर जाणीवपूर्वक 'मनसे'ने ईडी विरोधात ही तक्रार दिली आहे.

VIDEO: उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

अशी झाली होती चौकशी

तब्बल पावणे नऊ तासांच्या चौकशीनंतर राज ठाकरे गुरुवारी रात्री 8 वाजून 16 मिनिटांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर पडले.  राज ठाकरे यांनी चौकशीसाठी ईडीला पूर्ण सहकार्य केल्याचं सूत्रांनी सांगितलं.  राज ठाकरेंना पुन्हा चौकशीला बोलावण्यात येणार नसल्याचं समजतंय. गरज पडल्यास चार दिवसांनंतर पुन्हा चौकशीला बोलावणं जाऊ शकतं. दरम्यान, ईडीच्या कार्यालयाबाहेर संध्याकाळी मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. राज ठाकरेंचे कुटुंबीयसुद्धा त्यांच्या बाहेर येण्याची वाट पाहत त्याठिकाणी हजर होते. ईडीच्या कार्यालयाबाहेर आल्यानंतर राज ठाकरे कुटुंबीयांसोबत कृष्णकुंकडे रवाना झाले. कृष्णकुंजवर आल्यानंतर त्यांनी आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त केली. अशा नोटीसा देऊन माझं तोंड बंद करण्याचा कुणी प्रयत्न केल्यास तोंड बंद होणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती.

Loading...

मुख्यमंत्र्यांनी राणेंच्या भूमिकेबाबत केला मोठा खुलासा!

दमानियांची खोचक टीका

राज ठाकरे सहकुटुंब EDच्या चौकशीला निघाल्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खोचक टीका केली होती. राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार EDच्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला? असे 'ट्वीट' करून अंजली दमानिया यांनी टीका केली होती. बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण? सगळे मिळून ED अधिकाऱ्यांना माहिती देणार का? काय हा Drama?का सहानुभूती गोळा करण्याचा हा प्रयत्न, असेही अंजली दमानिया यांनी म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2019 07:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...