मनसेतील मतभेद चव्हाट्यावर, शिलेदारांनीच उपस्थितीत केले राज ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

मनसेतील मतभेद चव्हाट्यावर, शिलेदारांनीच उपस्थितीत केले राज ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. परंतु, पक्षातच त्यांच्या या निर्णयावर मतभेद चव्हाट्यावर आले आहे.

  • Share this:

मुंबई, 27 जानेवारी : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. परंतु, पक्षातच त्यांच्या या निर्णयावर मतभेद चव्हाट्यावर आले आहे. मनसेच्या आजच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी  NRC-CAA ला पाठिंबा देत भाजप बरोबर जात आहोत का? असा सवाल केला आहे. आता उद्या पुन्हा कृष्णकुंजवर बैठक होणार आहे.

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईतील रंगशारदा येथे आयोजित करण्यात आली होती. शॅडो कॅबिनेट आणि 9 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या मोर्चासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात येणार होती. या बैठकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे उशिरा आले होते. मात्र बैठक सुरू झाल्यानंतर केवळ 10 मिनिटांतच ते रंगशारदामधून बाहेर गेल्याची माहिती समोर आली.

राज ठाकरे बैठकीतून बाहेर पडल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांपुढे आपले मत व्यक्त केले.

NRC ला पाठिंबा देऊन मनसे भाजपच्या जवळ जात असल्याची लोकांमध्ये  प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. अशा भावना काही पदाधिकाऱ्यांनी नेत्यांपुढे मांडल्या. तसंच, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपण भाजप विरोधी भूमिका घेतली. मग आता NRC-CAA ला पाठिंबा देत भाजप बरोबर जात आहोत का ? असा सवालही पक्षातील काही सदस्यांनी विचारला.

आता उद्या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी  'कृष्णकुंज'वर सकाळी 10 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या शंकांचं निरसन करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आजच्या या बैठकीत  09 फेब्रुवारीच्या मोर्चाचा यशस्वी करण्यासाठी राज ठाकरेंनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्यात. त्याचबरोबर

मला हिंदूहृदयसम्राट म्हणणे बंद करा, आपण बाळासाहेबांची जागा घेवू शकत नाही, अशी सुचनाही राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केली.

अदनान सामीच्या 'पद्मश्री'ला मनसेचा विरोध

दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. कला क्षेत्रातून अदनाम सामीला पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. अदनान सामीला पुरस्कार जाहीर झाल्यामुळे मनसेनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करून मोदी सरकारच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.सुरेश वाडकर यांना पद्मश्री मिळाल्याचा आनंद साजरा करतोय, तोच आनंदावर थोडं विरजण पडलं अदनान सामीला दिलेल्या पद्मश्रीमुळे. २०१५ मध्ये म्हणजे मोदींच्याच काळात त्याला भारतीय नागरिकत्व मिळालं आणि लगेच चार वर्षात त्याला पद्मश्रीही बहाल केला. त्याला एवढं लिफ्ट करण्याचं कारण काय? असा सवाल खोपकर यांनी उपस्थितीत केला.

तसंच, मूळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला भारत सरकारने कोणताही पुरस्कार देऊ नये. हे मनसेचं ठाम मत आहे. त्यामुळे त्याला बहाल केलेल्या पद्मश्री पुरस्काराचा मनसेकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. अदनान सामीला जाहीर झालेला पद्म पुरस्कार त्वरित रद्द करण्यात यावा, अशी मागणीही खोपकर यांनी केली.

First published: January 27, 2020, 8:14 PM IST

ताज्या बातम्या