News18 Lokmat

महापौरांनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा,मनसेची मागणी

स्वच्छता शहरांच्या यादीत कल्याण डोंबिवलीचे स्थान घसरल्याची नैतिक जबाबदारी स्विकारुन महापौरांनी राजीनामा देऊन पालिका आयुक्तांची तातडीने बदली करण्याची मागणी मनसेने केली आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 5, 2017 08:42 PM IST

महापौरांनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा,मनसेची मागणी

प्रदीप भणगे, डोंबिवली

5 मे : स्वच्छता शहरांच्या यादीत कल्याण डोंबिवलीचे स्थान घसरल्याची नैतिक जबाबदारी स्विकारुन महापौरांनी राजीनामा देऊन पालिका आयुक्तांची तातडीने बदली करण्याची मागणी मनसेने केली आहे.

केंद्र सरकारने स्वच्छ शहरांची यादी जाहीर केली ज्यामध्ये कल्याण डोंबिवली 234 व्या क्रमांकावर फेकली गेली आहे. या सर्व अस्वच्छतेला केवळ सत्ताधारी आणि प्रशासन जबाबदार असल्याची कडवट टीका मनसेने पत्रकार परिषद घेऊन केली.

गेली 20 वर्षांहून अधिक काळ याठिकाणी एकाच पक्षाची सत्ता आहे. सध्या तर या महानगरपालिकेला 2 खासदार, 4 आमदार आणि 1 मंत्री असतानाही कल्याण डोंबिवलीची परिस्थिती बदलली नसल्याची संतप्त टीका मनसेचे विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी यावेळी केली.

सत्ताधारी आणि प्रशासन केवळ स्मार्ट सिटीचा टेंभा मिरवत असून गेल्या 2 वर्षांच्या काळात केवळ दिखाऊ स्वच्छता मोहिमा राबवल्या. तसंच स्वछता अभियानाच्या नावाखाली कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. या सर्व पार्श्वभूमीवर इथल्या बजबजपुरीची जबाबदारी स्विकारुन महापौर राजेंद्र देवळेकर यांनी राजीनामा द्यावा आणि आयुक्त ई. रविंद्रन यांची बदली करून तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 5, 2017 08:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...