‘पुनःश्च हरि ओम म्हणता आणि हरिलाच कोंडून ठेवता`मनसेचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल

‘पुनःश्च हरि ओम म्हणता आणि हरिलाच कोंडून ठेवता`मनसेचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल

तुम्ही हॉटेल्स सुरू करता, बार खुले करता आणि नंतर त्याची वेळही वाढवून देता मग फक्त मंदिरं खुले करण्यासाठी काय अडचण आहे.

  • Share this:

मुंबई 06 नोव्हेंबर: भाजप (BJP) सोबतच आता मनसेनेही (MNS) मंदिरं खुली करण्याच्या मुद्यावर (Reopen Temples) आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात बार (BAR) सुरू झाले, थिएटर्स सुरू झालेत, जीम आणि इतर सर्वच गोष्टी सुरू झाल्या मग काय फक्त मंदिरामुळेच कोरोना होते का? असा सवाल मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे पुनःश्च हरि ओम झालाय असं म्हणतात आणि आता हरिलाच कोंडून ठेवतात अशी बोचरी टीकाही त्यांनी केलीय.

Unlockची प्रक्रिया सुरू झाल्याने राज्यात आता सर्व व्यवहार सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यात अनेक गोष्टी सुरू करण्याला परवानगी दिली आहे. मात्र राज्यातली मंदिरं अजुनही सुरू झालेली नाहीत. भाजपने त्यासाठी जोरदार आंदोलनं सुरू केलं आहे.

मंदिरं सुरू करावीत अशी मनसेचीही भूमिका आहे. त्यामुळेच नांदगावकर यांनी ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धारेवर धरलं आहे.

तुम्ही हॉटेल्स सुरू करता, बार खुले करता आणि नंतर त्याची वेळही वाढवून देता मग फक्त मंदिरं खुले करण्यासाठी काय अडचण होत आहे तेच कळत नाही. या मागे काय लॉजिक आहे हे कोडच आहे असंही नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

हा फक्त मंदिरं उघडण्याचा प्रश्न नाही तर त्यावर अवलंबून असलेल्या हजारो लोकांच्या रोजी रोटीचा प्रश्न आहे. त्या लोकांची पोटं त्या व्यवसायावर अवलंबून आहेत असंही नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 6, 2020, 3:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading