S M L

मनसेच्या नगरसेवकांची घरवापसीची अफवा, शिवसेनेनं काढलं पत्रक

शिवसेनेत गेलेल्या दिलीप लांडे यांनी पत्रक काढून हे नगरसेवक शिवसेनेतच असल्याचा दावा केलाय. लांडेंनी काढलेल्या पत्रकावर सगळ्या नगरसेवकांच्या सह्या आहेत.

Sonali Deshpande | Updated On: Oct 26, 2017 01:07 PM IST

मनसेच्या नगरसेवकांची घरवापसीची अफवा, शिवसेनेनं काढलं पत्रक

26 आॅक्टोबर : मुंबई महापालिकेतील मनसेच्या नगरसेवकांची घरवापसीची अफवा असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय. मनसेतून शिवसेनेत गेलेल्या सहापैकी चार नगरसेवकांनी राज ठाकरेंशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली होती. शिवाय या नगरसेवकांना परत मनसेत जायचं असल्याचंही सांगण्यात येत होतं.

या चर्चेमुळे मुंबईतील राजकीय वातावरण एकदम तापलं होतं. पण शिवसेनेत गेलेल्या दिलीप लांडे यांनी पत्रक काढून हे नगरसेवक शिवसेनेतच असल्याचा दावा केलाय. लांडेंनी काढलेल्या पत्रकावर सगळ्या नगरसेवकांच्या सह्या आहेत.

दरम्यान, मनसेतून शिवसेनेत गेलेल्या दोन नगरसेवकांवर लाचलुचपत प्रतिबंध विभाग अर्थात एसीबी गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे. परमेश्वर कदम आणि दिलीप लांडे या नगरसेवकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. मनसेत राहिलेले एकमेव नगरसेवक संजय तुर्डे आणि भाजपाने याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार एसीबीकडून कारवाई केली जाणार असल्याचं बोललं जातं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 26, 2017 01:07 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close