अंबरनाथ हादरलं, मनसेच्या शहर उपाध्यक्षांची हत्या; 4 जणांनी केला हल्ला

अंबरनाथ हादरलं, मनसेच्या शहर उपाध्यक्षांची हत्या; 4 जणांनी केला हल्ला

गंभीर जखमी अवस्थेत पाटील यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारा पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

  • Share this:

अंबरनाथ 28 ऑक्टोबर: अंबरनाथ मनसेचे शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांची तीक्ष्ण हत्याराने हत्या करण्यात आलीय. अंबरनाथमधील पालेगाव परिसरात सायंकाळच्या सुमारास ही घटना घडलीय. पालेगाव भागात अनेक इमारतींचे बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी काही कामानिमित्त गेलेल्या पाटील यांच्यावर चार जणांनी तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला केला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

या हल्ल्याच्यावेळी पाटील यांनी त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी वार केले. गंभीर जखमी अवस्थेत पाटील यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारा पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

हल्ल्यानंतर तात्काळ अंबरनाथ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून आरोपींचा शोध सुरू केला त्यानंतर पोलिसांनी 4 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पाटील यांनी अंबरनाथ पालिकेच्या निवडणुकीसाठी कंबर कसली होती, त्याचबरोबर पालेगाव भागात नागरी समस्या घेऊन त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

त्यामुळे ही हत्या राजकीय घडामोडीतून घडली आहे की इतर काही कारणातून याचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आणिखी आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 28, 2020, 9:57 PM IST
Tags:

ताज्या बातम्या