Home /News /mumbai /

‘महाराष्ट्रातल्या घटनेवर अर्वाच्य पद्धतीने ओरडणारे गप्प का?’ हाथरसच्या घटनेवर राज ठाकरेंचा संताप

‘महाराष्ट्रातल्या घटनेवर अर्वाच्य पद्धतीने ओरडणारे गप्प का?’ हाथरसच्या घटनेवर राज ठाकरेंचा संताप

'पोलिसांनी पीडित मुलीच्या नातेवाईकांना भेटू दिलं नाही, त्यांना धक्काबुक्की केली जाते हे सगळेच अतिशय संताप आणणारे आहे. '

मुंबई 01 ऑक्टोबर: उत्तर प्रदेशातल्या हाथरस इथे घडलेल्या घटनेवर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुलीवर झालेला अत्याचार आणि त्यानंतर तिच्यावर केलेले अंत्यसंस्कार हा सगळा प्रकार हा मन विषण्ण करणारा आणि भीषण आहे. महाराष्ट्रात घडलेल्या एखाद्या घटनेवर अर्वाच्य पद्धतीने ओरडणारे आज गप्प का? असा सवालही राज ठाकरे यांनी केला आहे. या प्रश्नावर उत्तर प्रदेश सरकारला जाब विचारला पाहिजे. पोलिसांनी पीडित मुलीच्या नातेवाईकांना भेटू दिलं नाही, त्यांना धक्काबुक्की केली जाते हे सगळेच अतिशय संताप आणणारे आहे. उत्तर प्रदेश सरकारला नेमकी कशाची भीती वाटते असा सवालही त्यांनी केला आहे. सर्वच माध्यमं उत्तर प्रदेश सरकारवर तुटून का पडत नाहीत असा सवालही त्यांनी केला. राज ठाकरे म्हणाले,  उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेली बलात्काराची घटना, त्यानंतर उपचाराच्या दरम्यान त्या मुलीचा झालेला मृत्यू हे मन विषण्ण करणारं आहे पण त्याहून अधिक भीषण प्रकार म्हणजे त्या मुलीचा मृतदेह तिच्या घरच्यांच्या ताब्यात न देता तिच्यावर परस्पर अंत्यसंस्कार करणं. उत्तरप्रदेश पोलीस आणि तिथलं प्रशासन नक्की काय लपवायचा प्रयत्न करत आहे? बरं, समजा त्या पीडित मुलीच्या घरच्यांना कोणी भेटायला जात असेल तर त्यांना का अडवलं जात आहे? त्यांना धक्काबुक्की का केली जाते? नक्की कशाची भीती तिथल्या सरकारला वाटत आहे? महाराष्ट्रात एखादी घटना घडली तर स्वतःच स्वतःला देशाचा आवाज घोषित करून त्यावर अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत? सर्व माध्यमं उत्तरप्रदेश सरकारवर आज का तुटून पडत नाहीयेत? त्यांना का जाब विचारला जात नाहीये. यमुना एक्सप्रेस-वेवर राहुल गांधींसोबत नेमकं काय घडलं? पाहा Exclusive Photos हाथरस मधली ही घटना पाशवी आहे, पण अशा घटना घडल्या की काही दिवस राग व्यक्त करायचा आणि पुढे शांत बसायचं हे होऊन चालणार नाही, ह्यावेळेस अशा प्रवृत्तींच्या विरोधात, त्यावर अतर्क्य वागणाऱ्या कुठल्याही प्रशासनाला केंद्र सरकारने वठणीवर आणलेच पाहिजे! आज हाथरस येथे सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबीयांच्या भेटीसाठी जात असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचे समोर आले. या धक्काबुक्कीदरम्यान राहुल गांधी रस्त्यावर कोसळले. अशावेळी मोठा जमाव येथे उपस्थित होता. याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर मोठा गदारोळ झाला आहे. यावेळी यमुना एक्सप्रेस-वेवर राहुल गांधी यांच्यासोबत असलेल्या काही कार्यकर्ते व नेते होते. ते हाथरस येथे पीडित कुटुंबीयांना भेटीसाठी जात असताना अडविण्यात आले. हाथरसमध्ये 144 जमावबंदी लागू केल्यामुळे पुढे जाता येणार नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात येत होते. हे ही वाचा-Hathras Gang rape : राहुल गांधींना धक्काबुक्की; UP च्या पोलिसांकडून अटक यावेळी राहुल गांधींनी मी एकटा जाणार असल्याचे सांगितले. मात्र तरीही त्यांना पुढे जाऊ दिलं नाही. तर त्यांंना धक्काबुक्की केली. यामध्ये राहुल गांधींची कॉलर पकडण्यात आली व ते खाली पडले. यादरम्यान राहुल गांधी मी पीडित कुटुंबीयांची भेट घेतल्याशिवाय जाणार नसल्याचं सांगत होते. यावेळी सुरू असलेल्या गदारोळात 'ये देखो आज का हिंदुस्तान' असं ते समाजमाध्यमांना सांगत होते.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Raj raj thackeray

पुढील बातम्या