मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

देशभक्तीची प्रमाणपत्रं नरेंद्र मोदींनी वाटू नयेत, राज ठाकरेंचा हल्लाबोल

देशभक्तीची प्रमाणपत्रं नरेंद्र मोदींनी वाटू नयेत, राज ठाकरेंचा हल्लाबोल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मुंबई, 13 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 'नवाझ शरीफला केक भरवायला गेलेले असताना मोदींना देशभक्ती आठवली नाही. देशभक्तीची प्रमाणपत्रं नरेंद्र मोदींनी वाटू नयेत', असे म्हणत राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे.

मोदींच्या एअर स्ट्राईकबाबतच्या विधानाची उडवली खिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअर स्ट्राईकबाबत केलेल्या विधानावरही राज ठाकरेंनी टोला हाणला आहे. मोदींची खिल्ली उडवत ते म्हणाले की,  'युनोमध्ये ठराव झाला की ज्याला कोणाला युद्ध करायचं असेल त्यानं पावसाळ्यात युद्ध करावीत. जेणेकरून पाऊस पण मध्ये येईल, ढग पण मध्ये येतील आणि रडावर दिसणारही नाही. तुमचं काम पण होऊन जाईल आणि त्या देशालाही कळणार नाही की नेमका बॉम्ब कोणी टाकला. एक नवीन तंत्रज्ञान बाहेर येत आहे. याचा शोध पंतप्रधान मोदींनी शोध लावला आहे. आपण कोणत्या पदावर बसलो होतो, याचं भान सुटलं की ही माणसं अशी बोलायला लागतात. आमचा पंतप्रधान सुज्ञ असावा अशी आमची अपेक्षा होती'.

वाचा : नगर, शिर्डीसह उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीला अच्छे दिन येणार?

'दहशतवादाचं राजकारण कशाला?'

दहशतवादी हा दहशतवादी असतो. त्याला हिंदू आणि मुस्लिम असा धर्म नसतो. दहशतवाद्याला तिथल्या तिथे ठेचणं गरजेचं आहे. देशामध्ये कोणतंही सरकार आलं तर दहशतवादाला ठेचलंच पाहिजे, त्याचं राजकारण काय करायचं?. नरेंद्र मोदींनी देशाला जी स्वप्नं दाखवली होती, आश्वासनं दिली होती, त्यावर ते का बोलत नाहीत? असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला.

वाचा :रायगड लोकसभा निवडणूक : अनंत गीते VS सुनील तटकरे, झेंडा कुणाचा?

मराठा आरक्षणावरून टीकास्त्र

मराठी मुलांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिलं तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच भासणार नाही, असे मत राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत व्यक्त  केलं. 'सरकारला मराठा आरक्षण द्यायचंच नव्हतं. आरक्षणाबाबत सरकारनं विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे, असा थेट आरोपही त्यांनी केला.

पाहा : SPECIAL REPORT: 'तुम्ही काळजी करू नका, सरकारचा बंदोबस्त करू'

'महाराष्ट्राचा वाळवंट का होतोय?'

'सरकार कुणाचंही असो,चुकीच्या गोष्टीबद्दल बोललंच पाहिजे', अशीही भूमिका यावेळेस राज ठाकरे यांनी मांडली. पुढे ते असंही म्हणाले की, 'मोदी सरकारविरोधात मी बोलत आहे कारण त्यांनी कामं केलेली नाहीत. कामं केली नाहीत तर कोणतंही सरकार असो त्याविरोधात बोललंच पाहिजे. माझं सरकार आलं आणि मी फसवणूक केली तर माझ्याविरोधातही बोललंच पाहिजे'.

'कामं केली मग दुष्काळ जाहीर का करावा लागला?'

राज ठाकरेंनी राज्यातील दुष्काळावरूनही सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी काय केलं ते सांगावं. दुष्काळाची कामं केली तर मग दुष्काळ जाहीर का करावा लागला? अशी विचारणा त्यांनी केली. शिवाय, टँकर लॉबीचं पॉलिटिकल कनेक्शन तपासा, असा थेट आरोपही त्यांनी केला आहे. तसंच आमीर खान चांगलं काम करत आहेत, पण सरकार का करत नाही?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

निकालाआधी राज ठाकरेंचा मोदींवर घणाघात, पाहा UNCUT पत्रकार परिषद

First published:

Tags: Lok Sabha Elections 2019, Maharashtra Lok Sabha Elections 2019, Narendra modi, Raj Thackeray, Terrorism