S M L

भिडे गुरुजींच्या आंबेपुराणावर राज ठाकरे व्यंगचित्रातून म्हणाले...!

राज ठाकरे यांनी त्यांचा कुंचला पुन्हा एकदा चालवला आहे. यावेळी राज ठाकरे यांच्या कुंचल्याचे फटकारे सोशल मिडियात गाजत असलेल्या भिडे गुरुजींच्या भाषणातल्या आंब्याच्या गोष्टीवरून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Jun 14, 2018 08:30 AM IST

भिडे गुरुजींच्या आंबेपुराणावर राज ठाकरे व्यंगचित्रातून म्हणाले...!

मुंबई, 14 जून : राज ठाकरे यांनी त्यांचा कुंचला पुन्हा एकदा चालवला आहे. यावेळी राज ठाकरे यांच्या कुंचल्याचे फटकारे सोशल मिडियात गाजत असलेल्या भिडे गुरुजींच्या भाषणातल्या आंब्याच्या गोष्टीवरून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आहे.

माझ्या शेतातले आंबे खाल्ल्याने आजपर्यंत 180 जणांना अपत्य झाल्याचं अजब विधान संभाजी भिडे यांनी केलं होतं. त्यावर सर्व स्तरातून टीका होत असताना आता राज ठाकरेंनीही त्यांच्या शैलीत टीका केली आहे.

हेही वाचा...भिडेंच्या आंबापुराणावर राज ठाकरेंची टीका

'अय्या भिडेंच्या बागेतलं वाटतं' असं त्यांनी त्यांच्या चित्रात लिहलं आहे. यात एक बाई तिच्या बाळाला घेऊन उभी आहे. आणि दुसरी बाई तिला हे भिडेंच्या बागेतलं आहे का असा प्रश्न विचारत असल्याचं रेखाटलं आहे.

Loading...
Loading...

दरम्यान, काल 98व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाची सुरूवात झाली त्यातही राज ठाकरे यांनी संभाजी भिडे यांच्यावर टीका केली. अपत्यांची आपत्ती माझ्यावर नको असं ते म्हणाले होते.

पण या सगळ्यात सोशल मीडियावरून इतक्या टीका होत असतानाही भिडेंनी याबद्दल अद्याप कोणतीही प्रतिक्रिया माध्यमांना दिलेली नाही. त्यामुळे एक वेगळीच खळबळ उडाली आहे.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 14, 2018 08:23 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close