'ईडी' विरोधात मनसेची बंदची हाक; प्रेमाने ऐकलं तर ठीक, नाही तर 'खळ खट्याक'

'ईडी' विरोधात मनसेची बंदची हाक; प्रेमाने ऐकलं तर ठीक, नाही तर 'खळ खट्याक'

'महाराष्ट्रात त्या दिवशी जे घडेल त्याला शासन व सरकार जवाबदार असेल. राज ठाकरे यांना ईडी ची नोटिस म्हणजे ईव्हीएम ला विरोध केल्याचा राग आहे.

  • Share this:

अजित मांढरे, ठाणे18 ऑगस्ट : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मिळालेल्या ईडीच्या नोटीशीनंतर राजकारण तापायला सुरुवात झालीय. मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. येत्या 22 तारखेला राज ठाकरे यांना चौकशीसाठी बोलावल्यास मनसेने ठाणे बंदचं आव्हान केलंय. लोकांनी त्या दिवशी प्रेमाने बंद ठेवला चांगलं आहे, नाही तर कार्यकर्त्यांच्या रोषाला समोरं जावं लागेल असा इशारा मनसेचे ठाणे, पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिलाय. महाराष्ट्रात त्या दिवशी जे घडेल त्याला शासन व सरकार जवाबदार असेल असंही ते म्हणाले. राज ठाकरे यांना ईडी ची नोटिस म्हणजे ईव्हीएम ला विरोध केल्याचा राग आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

राज ठाकरेंना राष्ट्रवादीचा पाठिंबा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीची नोटीस काढून सत्ताधारी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केलाय.

देशभरात विविध यंत्रणांचा वापर करून विरोधकांना दाबण्याचा मोदी सरकारचा प्रकार सुरु आहे. ईडी किंवा सीबीआय असेल याचा दुरुपयोग कसा करायचा हे सरकारने दाखवून दिले आहे असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

कोहिनूर मिल प्रकरण: उन्मेश जोशी चौकशीसाठी ईडी कार्यालयात, इतर टॉप 18 बातम्या

मागील लोकसभा निवडणुकीत, राज ठाकरे यांनी सरकारच्या विरोधात काही प्रश्न निर्माण केले, ते भूमिका मांडतात त्यामुळे त्यांच्या मनात भिती निर्माण व्हावी म्हणून ही नोटीस राज ठाकरे यांना बजावण्यात आल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केलाय.

नोटीशीवर राज्य सरकारची प्रतिक्रिया

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने रविवारी नोटीस बजवली होती. या घटनेने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडालीय. मनसेने यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणात भाजपवर होत असलेल्या आरोपांवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केलीय. राज यांनी काही केलं नसेल तर त्यांना घाबरण्याचं कारण नाही. या घटनेचा राजकारणाशी संबंध नाही असं मत महाजन यांनी व्यक्त केलंय. तर नरेंद्र मोदींविरोधात आवाज उठवला त्यामुळेच ही  नोटीस बजावण्यात आल्याचं मनसेनं म्हटलंय.

अमोल कोल्हेंकडून आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेवर सडकून टीका

गिरीश महाजन म्हणाले, ईडी ही स्वायत्त संस्था आहे, कोणत्याही राजकीय कारणासाठी राज ठाकरेंना नोटीस बजावली नाहीये. राज यांनी काही केलं नसेल तर त्यांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. मनसेनं आंदोलन करावं किंवा नाही हा त्यांचा प्रश्न आहे.  राज ठाकरे यांना 21 ऑगस्टला चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आलंय. दादरमध्ये मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या कोहिनूर मिल खरेदी-विक्री प्रकरणात ही नोटीस बजावण्यात आलीय.

बिबट्याचा जवळून फोटो काढायला गेला अन्... पाहा थरारक VIDEO

Published by: Ajay Kautikwar
First published: August 19, 2019, 3:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading