राज ठाकरेंना 'ईडी'ची नोटीस; काही तासातच मनसेनं मागे घेतला हा निर्णय

राज ठाकरेंना 'ईडी'ची नोटीस; काही तासातच मनसेनं मागे घेतला हा निर्णय

ठाणे बंदचं आवाहन मनसेच्या स्थानिक नेत्यांनी केलं होतं. मात्र राजगडावरून आदेश आल्याने बंदचं आवाहन मनसेनं मागे घेतलंय.

  • Share this:

मुंबई 18 ऑगस्ट : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मिळालेल्या ईडीच्या नोटीशीनंतर राजकारण तापायला सुरुवात झालीय. मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. येत्या 22 तारखेला राज ठाकरेंना चौकशीला हजर राहावं लागणार आहे. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. राज्यभरातून मनसैनिक मुंबईत दाखल होणार असून दादर ते ईडी ऑफिस असा लाँग मार्च ते काढणार असल्याची माहिती मनसेकडून देण्यात येतेय. याच दिवशी मनसे आपली ताकद दाखवून देण्यासाठी कामाला लागली असून राजकीय संघर्ष तापविण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. याच दिवशी ठाणे बंदचं आवाहन मनसेच्या स्थानिक नेत्यांनी केलं होतं. मात्र राजगडावरून आदेश आल्याने बंदचं आवाहन मनसेनं मागे घेतलंय.

दरम्यान, व्यावसायीक आणि मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेश जोशी यांचीही याच प्रकरणात ईडीने आज चौकशी केली. ही चौकशी तब्बल आठ तास चालली. चौकशीसाठी पूर्ण सहकार्य केलं असून आणखी चौकशी होणार असल्याचं उन्मेश जोशी यांनी सांगितलं.

राज ठाकरेंवरची 'ईडी'ची पीडा टाळण्यासाठी हजारो मनसैनिक देणार साहेबांची साथ!

राज यांना चौकशीसाठी बोलावल्यास मनसे ठाणे बंद करेल असा इशाराही देण्यात आला होता. लोकांनी त्या दिवशी प्रेमाने बंद ठेवला तर चांगलं आहे, नाही तर कार्यकर्त्यांच्या रोषाला समोरं जावं लागेल असा इशारा मनसेचे ठाणे, पालघर जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला होता. महाराष्ट्रात त्या दिवशी जे घडेल त्याला शासन व सरकार जवाबदार असेल असंही ते म्हणाले होते. राज ठाकरे यांना ईडी ची नोटिस म्हणजे ईव्हीएम ला विरोध केल्याचा राग आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं होतं. मात्र पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी बंद नको असा निर्णय घेतल्याने हा बंद मागे घेण्यात आला.

विरोधकांची मागणी धुडकावली, पूरग्रस्त भागात सरसकट कर्जमाफी नाही

राज ठाकरेंना राष्ट्रवादीचा पाठिंबा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीची नोटीस काढून सत्ताधारी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केलाय.

देशभरात विविध यंत्रणांचा वापर करून विरोधकांना दाबण्याचा मोदी सरकारचा प्रकार सुरु आहे. ईडी किंवा सीबीआय असेल याचा दुरुपयोग कसा करायचा हे सरकारने दाखवून दिले आहे असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

'ईडी' विरोधात मनसेची बंदची हाक; प्रेमाने ऐकलं तर ठीक, नाही तर 'खळ खट्याक'

मागील लोकसभा निवडणुकीत, राज ठाकरे यांनी सरकारच्या विरोधात काही प्रश्न निर्माण केले, ते भूमिका मांडतात त्यामुळे त्यांच्या मनात भिती निर्माण व्हावी म्हणून ही नोटीस राज ठाकरे यांना बजावण्यात आल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केलाय.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 19, 2019, 8:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading