वाशी स्टेशनबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना चोपलं

वाशी स्टेशनबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना चोपलं

वाशी स्टेशनबाहेर अनेक अनधिकृत फेरीवाले उभे असतात. या फेरीवाल्यांविरोधात मनसेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. फेरीवाल्यांना बेदम चोप देऊन त्यांच्या गाड्यांची तोडफोड मनसे कार्यकर्त्यांनी केली

  • Share this:

वाशी, 27 ऑक्टोबर: काल मनसेच्या कार्यकर्त्याला फेरीवाल्यांनी चोप दिल्याची घटना घडल्यानंतर आता आज मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना चोप दिला आहे.

एकंदरच फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून मुंबईतील वातावरण तापत चाललं आहे.वाशी स्टेशनबाहेर अनेक अनधिकृत फेरीवाले उभे असतात. या फेरीवाल्यांविरोधात मनसेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. फेरीवाल्यांना बेदम चोप देऊन त्यांच्या गाड्यांची तोडफोड मनसे कार्यकर्त्यांनी केली. या अनधिकृत फेरीवाल्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी तिथून पळवून लावले आहेत. दरम्यान शुक्रवारी संजय निरूपमांनी फेरीवाल्यांचे आंदोलन काढले होते. त्याआधी कल्याण डोंबिवली ठाण्यातही मनसेने फेरीवाले हटाव मोहीम चालवली होती.

आता यापुढे फेरीवाले विरूद्ध मनसे हा संघर्ष कुठे जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 29, 2017 08:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading