फेरीवाल्यांविरोधात मनसे आक्रमक, दादरमधील फेरीवाल्यांना हुसकावलं

फेरीवाल्यांविरोधात मनसे आक्रमक, दादरमधील फेरीवाल्यांना हुसकावलं

मालाडमध्ये फेरीवाल्यांनी मनसे विभाग अध्यक्षावर जीवघेणा हल्ला केल्यानंतर मनसे पुन्हा आक्रमक झालीय. दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना हुसकावून लावलंय. यावेळी फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची मोठ्या प्रमाणावर तोडफोडही करण्यात आलीय. त्यामुळे मुंबईत फेरीवाले आणि मनसे पुन्हा आमने सामने आलेत.

  • Share this:

मुंबई, 28 ऑक्टोबर : मालाडमध्ये फेरीवाल्यांनी मनसे विभाग अध्यक्षावर जीवघेणा हल्ला केल्यानंतर मनसे पुन्हा आक्रमक झालीय. दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना हुसकावून लावलंय. यावेळी फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची मोठ्या प्रमाणावर तोडफोडही करण्यात आलीय. त्यामुळे मुंबईत फेरीवाले आणि मनसे पुन्हा आमने सामने आलेत.

दरम्यान, मालाडमध्ये मारहाण प्रकरणी हल्लेखोर फेरीवाल्यांवर खुनाचा प्रयत्न कलमांतर्गंत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसे कार्यकर्यांनी केलीय. त्यासाठी मालाड पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणावर मनसे कार्यकर्ते जमा झालेत. पोलिसांनी खबरदारी म्हणून मनसेच्या आंदोलकांना ताब्यात घेतलंय. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी हल्लेखोर फेरीवाल्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा मनसे आपल्या स्टाईलने प्रत्युत्तर देईल, अशा इशारा मनसेनं दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 28, 2017 08:04 PM IST

ताज्या बातम्या