काँग्रेसच्या फेरीवाला सन्मान मोर्च्यावर मनसेचा बटाटे हल्ला

काँग्रेसच्या फेरीवाला सन्मान मोर्च्यावर मनसेचा बटाटे हल्ला

त्या मोर्चाला मनसेचा विरोध होता. मुंबईत गेले काही दिवस सुरु असलेला फेरीवाल्यांचा विरोध थांबवण्यासाठी मुंबई काँग्रेसच्या वतीनं फेरीवाला सन्मान मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा दादर परिसरातील मुख्य रस्त्यांवरून फिरणार होता.याच मोर्चाचा मनसेने निषेध केला आहे. आणि मोर्च्यावर बटाटे फेकून मारले आहेत.

  • Share this:

मुंबई, 01 नोव्हेंबर:मुंबई काँग्रेसच्या सन्मान मोर्चावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी बटाटे फेकून मारले. त्यामुळे आंदोलनाची परिस्थिती चिघळली.त्यामुळे पोलिसांनी मनसे आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

आज काँग्रेसच्या वतीनं फेरीवाल्यांच्या  समर्थनासाठी फेरीवाला सन्मान मोर्चा काढला होता. त्या मोर्चाला मनसेचा विरोध होता. मुंबईत गेले काही  दिवस सुरु असलेला फेरीवाल्यांचा विरोध थांबवण्यासाठी मुंबई काँग्रेसच्या वतीनं फेरीवाला सन्मान मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा दादर परिसरातील मुख्य रस्त्यांवरून फिरणार होता.याच  मोर्चाचा मनसेने निषेध केला आहे. आणि मोर्च्यावर बटाटे फेकून मारले आहेत. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली  होती. मोर्चा मूक स्वरूपात निघणार आहे. कुठलीही घोषणाबाजी आम्ही करणार नाही असं सुद्धा काँग्रेसच्या वतीनं सांगण्यात आलयं.

याआधीही संजय निरूपम यांनी फेरीवाल्यांसाठी मोर्चा काढला होता. पण त्या मोर्चाला परवानगी नव्हती त्यामुळे निरूपम यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून भरपूर राजकारणही करण्यात आलं होतं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2017 10:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading