हप्ते बंद झाले म्हणून सेनेला फेरीवाल्यांचा पुळका आला का? मनसेचा आरोप

हप्ते बंद झाले म्हणून सेनेला फेरीवाल्यांचा पुळका आला का? मनसेचा आरोप

राज ठाकरे ठरवतील शिवसेनेनं फेरीवाल्यांच्या राजकारणात पडू नये. असा टोला मनसेचे दादर विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी मारलाय.

  • Share this:

13 नोव्हेंबर : शिवसेनेला आत्ताच फेरीवाल्यांचा पुळका का आला, हप्ते बंद झाले म्हणून? मराठी फेरीवाल्यांचं काय करायचं आहे तर राज ठाकरे ठरवतील शिवसेनेनं फेरीवाल्यांच्या राजकारणात पडू नये. असा टोला मनसेचे दादर विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी मारलाय. मनसेच्या वतीनं फेरीवाला विरुद्ध सुरु असलेलं आंदोलन हे आता एक पाऊल पुढे जाऊन जनजागृती या पातळीवर आलं असून मुंबईकरांचा पाठिंबा मिळवण्यासाठी पथनाट्य दादर परिसरात आज पथनाट्य सादर करण्यात आलं.

संजय राऊत यांनी अधिकृत असलेल्या फेरीवाल्यांची बाजू घेतलीय. त्यांच्या पोटावर कोणी पाय देऊ शकत नाही, त्यांना जगण्याचा अधिकार आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

रेल्वे स्टेशनच्या 150 किलो मीटर्सची जागा महानगरपालिकेनं फेरीवालामुक्तही करून दिलीय. त्यामुळे नागरिक खूशही झाले होते. पण याच पालिकेत ज्यांची सत्ता आहे त्या शिवसेनेचे नेते आता फेरीवाल्यांच्या बाजूनं उभे राहिलेत, याचं आश्चर्य व्यक्त होतंय. मनसेला मिळणारा लोकांचा पाठिंबा पाहून सेनेनं महिनाभरानं ही भूमिका घेतलीय की काय असा प्रश्न पडतोय.

 

First published: November 13, 2017, 1:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading