Home /News /mumbai /

MNS आणि Amazon आमने-सामने; कोर्टाने मनसेला दिला आदेश

MNS आणि Amazon आमने-सामने; कोर्टाने मनसेला दिला आदेश

अॅमेझॉनच्या ऑनलाइन अॅप्स (Online Apps) वर मराठी भाषा (Marathi Language) नाही. यावरुन मनसेने अॅमेझॉनविरोधात अभियान सुरू केलं आहे.

    मुंबई, 25 डिसेंबर : महाराष्ट्रातील जारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) आणि ई कॉमर्स (E Commerce) कंपनी अॅमेझॉनदेखील जारी वादात Civil कोर्टाने आदेश दिला आहे. दिंडोशी सिव्हील कोर्टाने मनसेला कंपनीचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामात अडसर आणू नये असा आदेश दिला आहे. कंपनीने मनसेविरोधात सिव्हील कोर्टात केस दाखल केली होती. विशेष म्हणजे मनसेने दिलेल्या माहितीनुसार अॅमेझॉनच्या ऑनलाइन अॅप्स (Online Apps) वर मराठी भाषा (Marathi Language) नाही. यावरुन मनसेने अॅमेझॉनविरोधात अभियान सुरू केलं आहे. मनसे नेता अखिल चित्रे यांनी सांगितलं की, आम्ही पाहिलं आहे की, अॅमेझॉनची सेवा दक्षिण भारतीय भाषांसाठी काम करीत आहे. मात्र ही सेवा मराठीतून नाही. यामुळे आम्ही कंपनीला त्यांच्या अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यासाठी अर्ज केला होता. यादरम्यान पक्षाच्या प्रतिनिधींमध्ये अनेक बैठका झाल्या, मात्र मनसेकडून केल्या जाणाऱया कारवाईबद्दल ऐकून अॅमेझॉनने सिव्हील कोर्टाचं दार ठोठावलं. कंपनीने मनसेविरोधात कोर्टात पाच गुन्हे दाखल केले आहेत. अॅमेझॉनकडून कोर्टात आलेल्या वकिलांनी सांगितलं की, प्रतिवादी मनसेचे कार्यकर्ते अॅमेझॉनला धमकी देत आहे आणि प्रतिवादी अनुचित प्रकारे कर्मचाऱ्यांची मदत घेत आहे. ते कार्यालयातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भडकावत आहेत. यावर मनसेने क्षेत्राधिकारचा मुद्दे पुढे केला आणि अॅमेझॉनकडून केलेल्या तक्रारीवर विरोध दर्शवला. दिंडोशी स्थित सिव्हील कोर्टाने अॅमेझॉनला दिलासा देत म्हटलं की, हे पाहून असं वाटत आहे की, वादीला काम करण्यासाठी सुरक्षा देणं आवश्यक आहे. जर असं केलं नाही तर व्यवसायात काम करताना अनेक अडचणी येतील.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Amazon, MNS, Raj thacarey

    पुढील बातम्या