मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Amit Thackeray: अमित ठाकरे डोंबिवली दौऱ्यावर, खड्डेमय रस्त्यांमुळे लोकलने प्रवास

Amit Thackeray: अमित ठाकरे डोंबिवली दौऱ्यावर, खड्डेमय रस्त्यांमुळे लोकलने प्रवास

Amit Thackeray travel by local train: अमित ठाकरे हे तीन दिवसांच्या कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर आहेत.

Amit Thackeray travel by local train: अमित ठाकरे हे तीन दिवसांच्या कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर आहेत.

Amit Thackeray travel by local train: अमित ठाकरे हे तीन दिवसांच्या कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर आहेत.

मुंबई, 1 ऑक्टोबर : राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे चिरंजीव आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) हे तीन दिवसीय कल्याण-डोंबिवलीच्या दौऱ्यावर (Kalyan Dombivli tour) आहेत. कल्याण डोंबिवलीत अमित ठाकरे हे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. डोंबिवली दौऱ्यावर जाण्यासाठी अमित ठाकरे हे निघाले मात्र, त्यांनी यासाठी कारचा मार्ग न निवडता थेट लोकल ट्रेन गाठली. (Amit Thackeray travel by local train)

दादरहून लोकल ट्रेनने प्रवास

कल्याण डोंबिवली तील समस्या आणि आगामी निवडणूक असा हा दौरा असून या दौ-यात पदाधिकारी आणि कल्याण डोंबिवलीकर यांच्याशी अमित ठाकरे संवाद साधणार आहेत. राज्यात सर्वत्र असलेली खड्ड्यांची समस्या आणि खड्ड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी यामुळे अमित ठाकरे यांनी लोकल ट्रेनने डोंबिवली गाठण्याचा निर्णय घेतला. यासाठी अमित ठाकरे दादर रेल्वे स्थानकावर पोहोचले आणि तेथून लोकलमध्ये बसून डोंबिवलीकडे प्रवास सुरू केला.

"निवडणुकीची थट्टा लावलीय, नुसता खेळ सुरू आहे" बहुसदस्यीय प्रभाग समितीवरुन राज ठाकरे संतापले

अमित ठाकरे यांनी खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन टीका करताना म्हटलं, रस्ते असे बनतातच कसे ज्याला खड्डे पडतात. आम्ही नुसते बोलत नाही करून दाखवले, मुंबईकरांना खड्डे मुक्त रस्ते हवे असतील तर सत्ता बदल हा एकमेव मार्ग आहे. नाशिकमध्ये खड्डे शोधून सापडत नाही. मी आज एकदिवस वेळ वाचावा म्हणून लोकलने जात आहे. पण ज्यांना रोज येजा करावी लागते त्यांचे फ्रस्ट्रेशन काय असेल? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पक्षबांधणीसाठी या बैठका आहेत. निवडणुकीसाठी या बैठका नाहीयेत तर सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पक्षाकडून काय पावलं उचलता येतील यावर बैठकीत चर्चा होईल. खड्ड्यांचा मुद्दा मला वाटत नाही की यांच्याकडून सुटेल. आमच्याकडे सत्ता आली तर खड्डेमय रस्ते नक्कीच नसतील अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी डोंबिवलीला जाताना प्रसारमाध्यमांना दिली.

"काँग्रेस बुडवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतली, सिद्धूसारख्या उपऱ्यावर फाजील विश्वास टाकण्याची गरज नव्हती"

खड्ड्यांवरुन अमित ठाकरेंचा संताप

कालच अमित ठाकरे यांनी सोशल मीडियात पोस्ट करुन खड्ड्यांवरुन संताप व्यक्त केला होता. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं की, रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे होणारे ट्रॅफिक जाम, अपघात, वाया जाणारे इंधन या गोष्टींमुळे अगदी सर्वांचंच कंबरडं मोडलंय. पण सत्ताधारी राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या भ्रष्टाचारी आघाडीला त्याच्याशी काही देणंघेणं नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्डेविरोधी आंदोलनं करतोय. खड्डयांबाबत उच्च न्यायालयातही वारंवार खोटं बोलणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होऊ शकेल.

नाशिकचा दौरा केल्यानंतर अमित ठाकरे हे कल्याण डोंबिवलीचा दौरा करत आहेत. 1 ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबर असा हा तीन दिवसांचा दौरा आहे. आगामी निवडणुका लक्षात घेत राज ठाकरेंनी मुंबईसोबतच नाशिक, पुणे, कल्याण-डोंबिवलीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. याचाच एक भाग म्हणून गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे, अमित ठाकरे यांचे नाशिक, पुण्यात दौरे सुरू झाले आहेत.

First published:

Tags: MNS, Mumbai local, Raj thackeray dombivli