Home /News /mumbai /

शेवटचा आमदारही "बाबा ओरडतील" म्हणून शिंदे गटात नाही आला; मनसेने आदित्य ठाकरेंना डिवचलं

शेवटचा आमदारही "बाबा ओरडतील" म्हणून शिंदे गटात नाही आला; मनसेने आदित्य ठाकरेंना डिवचलं

अमेय खोपकर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं, 'शेवटच्या आमदाराला सुद्धा ऑफर दिली होती. पण, "बाबा ओरडतील" म्हणून नाही आला.' अमेय खोपकर यांच्या या ट्विटचा रोख हा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या दिशेनं आहे

    मुंबई 27 जून : शिवसेनेचे अनेक आमदार आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात सामील झाले आहेत. यानंतर आता शिवसेनेच मोजकेच मंत्री आणि आमदार उरले आहेत. यादरम्यान राज्यातील या राजकीय परिस्थितीवरुन अनेकांनी निरनिराळे ट्विट करत राजकारण्यांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अमेय खोपकर (Amey Khopkar Tweet) यांनीही शिवसेनेवर खोचक शब्दांत टीका केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना फोन अमेय खोपकर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं, 'शेवटच्या आमदाराला सुद्धा ऑफर दिली होती. पण, "बाबा ओरडतील" म्हणून नाही आला.' अमेय खोपकर यांच्या या ट्विटचा रोख हा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या दिशेनं आहे. याशिवाय आणखी एक ट्विट करत खोपकर यांनी शिवसेनेला डिवचलं आहे. 'एकनाथ शिंदेंसोबत इतके आमदार निघून गेले आहेत की, उद्धव ठाकरेंनी आता पक्षाचं नाव शिवसेनाऐवजी "शिल्लक सेना" करून घ्यावं' असा खोचक सल्लाही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला आहे. याशिवाय त्यांनी आपल्या आणखी एका ट्विटमध्ये म्हटलं, 'आसामच्या चहासाठी सामंत डेअरीचं दूध. सेनेच्या मानगुटीवर नाराजीचं भूत. कोटीच्या कोटी चार्टर्ड उड्डाणे. विश्वप्रवक्त्यांचे तेच तेच रडगाणे. पोकळ धमक्यांना भीक कोणी घालेल का?छाती फुगवून बेडकाचा बैल होईल का? ...तर एकनाथ शिंदेंचा गट मनसेमध्ये विलीन होणार? महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट! एकंदरीतच एकामागे एक ट्विट करत मनसेच्या अमेय खोपकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. दरम्यान रविवारीच एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत फोनवरुन संवाद साधल्याचं वृत्त समोर आलं आहे. तब्येतीची विचारपूस करण्यासाठी हा फोन केला गेल्याचं सांगण्यात आलं. मात्र यात काही राजकीय चर्चा झाली का? याबाबतचं वृत्त अद्याप समोर आलेलं नाही. दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ फोनवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Eknath Shinde, MNS, Uddhav thackeray

    पुढील बातम्या