'शिवसेनेला मनसेची ॲलर्जी, म्हणून...' संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

'शिवसेनेला मनसेची ॲलर्जी, म्हणून...' संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

'सरकारचं ना पावसाचं नियोजन ना कोरोना नियंत्रणासाठी योग्य नियमावली. कोरोनामुळे, पावसामुळे लोकांचे जीव जात आहेत, तर मग लोकांनी टॅक्स का भरायचा'

  • Share this:

मुंबई,  24 सप्टेंबर : मुंबईत लोकल सुरू करा यासाठी काही दिवसांपूर्वी मनसेच्या नेत्यांनी सविनय कायदेभंग करीत लोकलमधून प्रवास केला होता. त्यानंतर राज्य सरकारकडून त्यांच्यावर नियमभंग केल्याप्रकरणी कारवाईदेखील करण्यात आली. आता पुन्हा मनसे नेता संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात व मुंबईती सुरू असलेल्या तुफान पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईची पाहणी केली होती. आता मनसे नेता संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे. तुम्हाला शिकण्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळू नका, असे म्हणत देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. आम्हाला मुसळधार पावसामुळे शिकायला मिळालं, असं पाहणीदरम्यान आदित्य ठाकरे म्हणाले होते.

हे ही वाचा-मुंबईची दैना! मुसळधार पावसाचं पाणी शिरलं नाट्यगृहात, PHOTOS पाहून बसेल धक्का

सरकारचं ना पावसाचं नियोजन ना कोरोना नियंत्रणासाठी योग्य नियमावली. कोरोनामुळे, पावसामुळे लोकांचे जीव जात आहेत, तर मग लोकांनी टॅक्स का भरायचा, असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. शिवसेनेला मनसेची ॲलर्जी, त्यामुळेच ते रेल्वे विषयावर आमच्याशी चर्चा करीत नाही. सरकारची मानसिकता हुकुमशाहीची म्हणूनच लोकल सेवा सुरु करण्याबद्दल आमच्याशी चर्चा करत नाहीये, असा आरोपही देशपांडे यांनी यावेळी लावला.

हे ही वाचा-महिनाभर पडणारा पाऊस अवघ्या 8 ते 12 तासांत, आदित्य ठाकरेंनी सुरू केलं मोठं काम

संदीप देशपांडे यांच्यासह आंदोलन करणाऱ्या 3 पदाधिकाऱ्यांवर आपत्तीकाळात सरकारची कोणतीही परवानगी नसताना प्रवास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या  कलम 51, 52 तसंच महाराष्ट्र कोविड उपाययोजना 2019 च्या कलम 11, त्यासह भारतीय रेल्वे अधिनियम 147, 153, 156 अंतर्गत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: September 24, 2020, 9:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading