ठाणे, कल्याण, डोंबिवलीपाठोपाठ वडाळ्यात मनसेकडून फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड

ठाणे, कल्याण, डोंबिवलीपाठोपाठ वडाळ्यात मनसेकडून फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड

आंदोलनाचा 16वा दिवस असल्यानं कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत आणि ठाणे स्थानकाबाहेरचा परिसर त्यांनी फेरीवालेमुक्त केलाय.अनेक फेरीवाल्यांचं यात नुकसान झालंय.

  • Share this:

21 आॅक्टोबर : ठाण्यामध्ये मनसेनं फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू केलीय.आंदोलनाचा 16वा दिवस असल्यानं कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत आणि ठाणे स्थानकाबाहेरचा परिसर त्यांनी फेरीवालेमुक्त केलाय.अनेक फेरीवाल्यांचं यात नुकसान झालंय. कारण फेरीवाल्यांना हुसकवण्याच्या नादात त्यांच्या मालाचं नुकसान कार्यकर्त्यांनी केलंय.

ठाण्यापाठोपाठ कल्याण पश्चिमेला स्टेशनबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना हटवलं. हे करताना अनेक फेरीवाल्यांचं सामान रस्त्यावर फेकून देण्यात आलं. चहाचं सामान, दूध, गॉगल इत्यादी वस्तूंची मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली.

तर डोंबिवली रेल्वे स्थानकात मनसेनं रेल्वे स्टेशन मास्तर कार्यालयावर धडक दिली आणि जोरदार घोषणाबाजी केली.

वडाळा स्थानकाबाहेरही मनसेनं आज आंदोलन केलं. अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात हे आंदोलन करण्यात आलं. वडाळा स्थानकाबाहेर असलेल्या फेरीवाल्यांच्या गाड्याही मनसेच्या कार्यकर्त्यांनी उलथून टाकल्या.

ठाणे आणि मुंबईतल्या मनसैनिकांच्या आंदोलनाचे पडसाद मुंबईच्या इतर भागातही पाहायला मिळाले. वसईत मनसैनिकांनी अनधिकृत फेरीवल्यावर जोरदार हल्ला केला. वसई रेल्वे स्थानकातील पूर्व व पश्चिमेतील फेरीवाल्यांची दुकाने मनसैनिकांनी तोडली. मराठी असो किंवा कोणीही,अनधिकृत फेरीवाले चालणार नाहीत अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

मुंबई एलफिन्स्टन रोड स्थानकावर चेंगराचेंगरी झाल्यावर मनसेनं 5 ऑक्टोबरला मोर्चा काढला होता आणि रेल्वे प्रशासनाला 15 दिवसांचा वेळ दिला होता. काल 15 दिवस पूर्ण झाले, म्हणून आजची हा कारवाई करण्यात आली.

15 दिवसात पादचारी पूल आणि स्टेशनबाहेरील रस्ते फेरीवालेमुक्त करण्याचं अल्टिमेटम त्यांनी दिलं होतं. 15 दिवसात तसं न झाल्यास 16 व्या दिवशी आपल्या स्टाइलनं पादचारी पूल आणि रस्ता फेरीवालामुक्त करु, असंही राज ठाकरेंनी रेल्वे प्रशासनाला ठणकावलं होतं.

First published: October 21, 2017, 11:21 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading