Home /News /mumbai /

VIDEO : राज ठाकरेंच्या मनसेचा मुंबईतही खळखट्याक, ॲमेझॉनला दिला दणका!

VIDEO : राज ठाकरेंच्या मनसेचा मुंबईतही खळखट्याक, ॲमेझॉनला दिला दणका!

पुण्यापाठोपाठ मुंबईच्या पवई परिसरातील ॲमेझॉन गोडाऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडले आहे.

मुंबई, 25 डिसेंबर : ॲमेझॉनने आपल्या ॲपमध्ये मराठी भाषा समाविष्ट करून घेण्यात नकार दिल्यानंतर राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. पुण्यापाठोपाठ मुंबईच्या पवई परिसरातील ॲमेझॉन गोडाऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी ॲमेझॉनच्या कार्यालयामध्ये प्रवेश करू नये म्हणून नोटीस बजावण्यात आली होती. कालच ही नोटीस बजावण्यात आल्यानंतर राज्यभरात मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आज मनसे कार्यकर्त्यांनी ॲमेझॉनच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. मराठी नाही तर ॲमेझॉनही नाही... व्यवहारासाठी ॲमेझॉन कंपनीने महाराष्ट्रात मराठी भाषेचा समावेश करावा, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून मनसेकडून करण्यात येत आहे. मात्र ॲमेझॉन कंपनीने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. ॲमेझॉनने आपल्या ॲपमध्ये इतर भाषांना स्थान दिलं असलं तरी मराठी भाषा सामावून घेण्यास असमर्थता दाखवलेली आहे. त्यामुळे मनसेने या विरोधात आंदोलन पुकारले असून मराठी भाषा नाही ॲमेझॉन नाही अशी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत काही दिवसांपूर्वीच दिंडोशी विधानसभेतील मनसे कार्यकर्त्यांनी ॲमेझॉनच्या जाहिरातीचे होर्डिंग फाडले होते.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Amazon, MNS, Raj Thackeray

पुढील बातम्या