मनसैनिकांवरील फेरीवाल्यांच्या हल्ल्याचं, निरुपम यांच्याकडून पुन्हा समर्थन !

मनसैनिकांवरील फेरीवाल्यांच्या हल्ल्याचं, निरुपम यांच्याकडून पुन्हा समर्थन !

यामुळे मनसेनं आता गुंडागर्दी सोडून द्यावी असा सल्लाही निरुपम यांनी दिलाय.

  • Share this:

27 नोव्हेंबर : जर मनसे कार्यकर्ते गरीब फेरीवाल्यांना पोलिसांसमोर हल्ले करत असतील तर अॅक्शनला रिअॅक्शन मिळेलच असं म्हणत विक्रोळीत मनसे पदाधिकाऱ्यांवर फेरीवाल्यांनी केलेल्या हल्ल्याचं काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी समर्थन केलंय.

रविवारी मुंबईतील विक्रोळी भागात मराठी पाट्यांच्या मुद्यावरून फेरीवाल्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला केलाय. या हल्ल्यात विक्रोळीचे उपशाखाप्रमुख उपेंद्र शेवाळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालीये. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा संजय निरुपम यांनी जाहीरपणे समर्थन केलंय.

संजय निरुपम यांनी टि्वट केलंय. या टि्वटमध्ये रविवारी पुन्हा मनसेच्या गुंडांना मारहाण झाली. आम्ही हिंसा करण्याच्या विरोधात आहोत. पण, गरीब फेरीवाल्यांच्या पोटावर जेव्हा दररोज मनसेचे कार्यकर्ते लाथ मारत आहे. पोलिसांच्या समोर हा प्रकार होतोय. जर असंच होत असेल अॅक्शनला रिअॅक्शन असेच मिळेल असं निरुपम यांनी म्हटलंय. तसंच यामुळे मनसेनं आता गुंडागर्दी सोडून द्यावी असा सल्लाही निरुपम यांनी दिलाय.

याआधीही मालाडमध्ये विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांनी हल्ला केला होता. तेव्हाही "मालाडमध्ये जे घडलं त्यात फेरीवाल्यांनी आपलं स्वसंरक्षण केलंय" असं म्हणत संजय निरुपम यांनी एकाप्रकारे समर्थन केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 27, 2017 12:40 PM IST

ताज्या बातम्या