Home /News /mumbai /

विधानपरिषद निवडणूक : अजित पवारांची काँगेस नेत्यांसोबत बैठक; मुख्यमंत्री नाराज, शिवसेनेचं 'हॉटेल पॉलिटिक्स'

विधानपरिषद निवडणूक : अजित पवारांची काँगेस नेत्यांसोबत बैठक; मुख्यमंत्री नाराज, शिवसेनेचं 'हॉटेल पॉलिटिक्स'

शिवसेना समर्थक तसंच अपक्ष आमदारांना राष्ट्रवादी आणि काँगेस नेते संपर्क करत असल्याचं समोर आलं आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज आहेत. अपक्षांचं मत मिळवण्यासाठी या बैठकीत रणनीती ठरल्याचं बोललं जात आहे.

मुंबई 17 जून : राज्यात आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या (MLC election 2022) पार्श्वभूमीवर विविध घडामोडी घडत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha election) भाजपने महाविकास आघाडीला अनपेक्षित धक्का दिला. (bjp, mahavikas aghadi)  यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत (mlc election) महाविकास आघाडीकडून सावध भूमिका घेतली जात आहे. यासाठी सगळेच पक्ष कामाला लागले आहेत. आता नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत काँगेस नेत्यांची बैठक झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी गुप्त बैठक पार पडली. यासाठी अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यानंतर दोघंही एकाच गाडीत बाहेर पडले. मात्र, आता या सर्वादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याचं समोर आलं आहे. विधानपरिषद निवडणूक : सदाभाऊ खोत यांनी सांगितलं माघारीचं कारण, फडणवीसांबद्दल म्हणाले... शिवसेना समर्थक तसंच अपक्ष आमदारांना राष्ट्रवादी आणि काँगेस नेते संपर्क करत असल्याचं समोर आलं आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज आहेत. अपक्षांचं मत मिळवण्यासाठी या बैठकीत रणनीती ठरल्याचं बोललं जात आहे. 'नाना पटोलेंचं मानसिक संतुलन बिघडतंय, काँग्रेस नेतृत्वास विनंती, रुग्णालयात घेऊन जा', आशिष शेलारांची खोचक टीका दुसरीकडे विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या हॉटेल पॉलिटिक्सला वेग आला आहे. शिवसेना आणि समर्थक आमदारांची बैठक दुपारी ४ वाजता सह्याद्री अतिथीगृहात होणार आहे. यानंतर पवई येथील हॉटेल रिनॉसन्समध्ये ठेवलं जाणार आहे. आमदार 20 जूनला हॉटेलमधून मतदानाला जाणार आहेत. आमदारांना बॅगा घेऊन येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सेनेचे आमादर 20 जूनपर्यंत हॉटेलमध्येच मुक्कामी राहाणार आहेत. यासोबतच समर्थक अपक्ष आमदराही हॉटेलमध्ये थांबणार आहेत.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Elections

पुढील बातम्या