• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • mlc election :..आणि चित्रा वाघ यांची आमदारकीची संधी हुकली, 'या' नावाची झाली घोषणा

mlc election :..आणि चित्रा वाघ यांची आमदारकीची संधी हुकली, 'या' नावाची झाली घोषणा

 चित्रा वाघ यांनी विधान परिषदेच्या (mlc election maharashtra 2021) आमदारकीचे स्वप्न पाहिले होते. पण, त्यांच्या स्वप्नावर आता पाणी फेरलं गेलं.

चित्रा वाघ यांनी विधान परिषदेच्या (mlc election maharashtra 2021) आमदारकीचे स्वप्न पाहिले होते. पण, त्यांच्या स्वप्नावर आता पाणी फेरलं गेलं.

चित्रा वाघ यांनी विधान परिषदेच्या (mlc election maharashtra 2021) आमदारकीचे स्वप्न पाहिले होते. पण, त्यांच्या स्वप्नावर आता पाणी फेरलं गेलं.

  • Share this:
मुंबई, 19 नोव्हेंबर :  महिला अत्याचार असो अथवा इतर मुद्दे असो या ना त्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारवर (mva government) टीकेचा आसुड सोडण्यात  भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) एकही संधी सोडत नाही. त्यामुळेच चित्रा वाघ यांनी विधान परिषदेच्या (mlc election maharashtra 2021) आमदारकीचे स्वप्न पाहिले होते. पण, त्यांच्या स्वप्नावर आता पाणी फेरलं गेलं आहे. भाजपकडून मुंबई विभागातून राजहंस सिंह  यांना उमेदवारी दिली आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपल्या 5 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये कोल्हापूरमधून अमन महाडिक, धुळ्यातून अमरिश पटेल, नागपूरमधून चंद्रशेखर बावनकुळे, अकोल्यातून वसंत  खंडेलवाल आणि मुंबईतून राजहंस सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून चित्रा वाघ यांना मुंबई विभागातून संधी दिली जाणार अशी चर्चा रंगली होती. मुंबई महानगरपालिकेमधून विधान परिषदेसाठी 2 आमदार निवडून दिले जातात. यासाठी सदस्य संख्या ही 70 पेक्षा जास्त असावी लागते. त्यामुळे भाजपचं संख्याबळ पाहता एक उमेदवार निवडून येऊ शकतो.

नवरा तुरुंगात गेल्यानंतर पत्नीने सांभाळला अवैध व्यवसाय; साम्राज्य वाढवलं!

त्यामुळे चित्रा वाघ यांच्या नावावर चर्चा रंगली होती. पण, ऐनवेळी दिल्लीत चित्रा वाघ यांचे नाव वगळण्यात आले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी मतांचा टक्का हा शिवसेनेच्या बाजूने असतो. त्यामुळे मराठी उमेदवार देण्याऐवजी भाजपने उत्तर भारतीय मतदारांना डोळ्यासमोर ठेवून राजहंस सिंह यांना उमेदवारी दिली आहे.

शेतीचे काम आवरून 4 जण दुचाकीवरून चालले होते घरी, कारच्या धडकेत सर्वांचा मृत्यू

चित्रा वाघ यांनी अलीकडच्या काळात पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात आक्रमकपणे बाजू मांडली होती. त्यामुळे संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. महिलांच्या मुद्यावर चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारला प्रत्येक वेळी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे साहजिक चित्रा वाघ यांचं नाव आमदारकीसाठी पुढे आलं होतं. पण, ऐनवेळी त्यांच्या स्वप्नावर पाणी फेरलं गेलं. भाजपचे विधानपरिषद निवडणुकीचे उमेदवार  १. कोल्हापूर- अमल महाडीक २. धुळे नंदुरबार- अमरिष पटेल ३.नागपूर- चंद्रशेखर बावनकुळे ४. अकोला-वाशीम वसंत खंडेलवाल ५.मुंबई- राजहंस धनंजय सिंह
Published by:sachin Salve
First published: