आमदारांची फुटबाॅल मॅच आणि मुख्यमंत्र्यांची काॅमेंट्री

आमदारांची फुटबाॅल मॅच आणि मुख्यमंत्र्यांची काॅमेंट्री

विधानसभेत नेहमी राजकीय फुटबॉल खेळणारे आमदार आज खऱ्या फुटबॉल सामन्यात एकमेकांना भिडले

  • Share this:

10 आॅगस्ट : विधानसभेत नेहमी राजकीय फुटबॉल खेळणारे आमदार आज खऱ्या फुटबॉल सामन्यात एकमेकांना भिडले. अध्यक्ष इलेव्हन आणि सभापती इलेव्हन असे दोन संघ त्यासाठी बनवण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मॅचची काॅमेंट्री केली तर विनोद तावडे रेफ्री होती.

जागतिक फुटबॉल महासंघ (फिफा) ही 17 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात भारतात होणार आहे. विशेष म्हणजे भारतीय उपखंडामध्ये होणारी ही पहिली फिफाची विश्वचषक स्पर्धा आहे. त्यामुळेच राष्ट्रीय स्तरावर 'मिशन 11 मिलियन' हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. याच निमित्ताने सभापती 11 विरुद्ध अध्यक्ष 11 अशा या आमदार चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं आहे.

ही स्पर्धा विधिमंडळाच्या परिसरात खेळली गेली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी कॉमेंट्री करत खेळाडू आमदारांचा उत्साहही वाढवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 10, 2017 06:54 PM IST

ताज्या बातम्या