...अन्यथा परिस्थिती आणखी हाताबाहेर जाईल, या आमदाराने दिला राज्य सरकारला इशारा!

...अन्यथा परिस्थिती आणखी हाताबाहेर जाईल, या आमदाराने दिला राज्य सरकारला इशारा!

देशाची आर्थिक राजधानी मुंबई जीवघेणा विषाणू कोरोनाचा हॉटस्पॉट बनली आहे, राज्य सरकारने आधीच लक्ष द्यायला हवं होतं, असं म्हणत आमदाराने हा इशारा दिला आहे.

  • Share this:

बीड, 1 मे: देशाची आर्थिक राजधानी मुंबई जीवघेणा विषाणू कोरोनाचा हॉटस्पॉट बनली आहे. सुरुवातीलाच राज्य सरकारने लक्ष दयायला हवं होतं, पण दुर्दैवाने ते दिलं गेलं नाही. म्हणून मुंबईची ही अवस्था झाली आहे. आता मुंबई महानगरपालिकेकडील कोरोना संदर्भातील यंत्रणा राज्य सरकारनं स्वतः हातात घ्यावी. तरच कोरोना नियंत्रणात येऊ शकतो, अन्यथा आणखी कठीण परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही, असं मत आमदार विनायक मेटे यांनी व्यक्त केलं आहे.

आमदार विनायक मेटे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी पत्र पाठवून मागणी केली आहे. आमदार मेटे यांनी या पत्रात महत्त्वाचे 24 मुद्दे नमूद केले आहेत.

अखेर सरकार सोडणार अडकलेल्यांसाठी स्पेशल ट्रेन; काय आहे आदेश?

आमदार विनायक मेटे यांनी सांगितलं की, मुंबई महानगरपालिकेकडील कोरोना संदर्भातील सगळ्या यंत्रणा राज्य सरकारने स्वतःकडे घ्याव्यात. तरच कोरोना नियंत्रणाय येऊ शकतो. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येणं गरजेचं आहे. यासाठी परराज्यतील लोकांना त्यांच्या राज्यात जायला परवानगी दयावी. तसेच झोपडपट्टीतील नागरिकांना त्यांच्या मूळगावी जाऊ द्यावे, अशी देखील मागणी केली आहे.

त्याचबरोबर मुंबईमधील 36 विधानसभा मतदार संघाचे झोन तयार करून आयएएस आणि आयपीएसच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांची झोनल प्रमुख म्हणून नियुक्ती करावी. त्यांना अधिकार दयावे तसेच राज्य सरकारने स्वतःकडे कंट्रोल घ्यावं. तेव्हाच कोरोनावर मात करू शकतो, अन्यथा परिस्थिती आणखी कठीण होईल, असा इशाराही विनायक मेटे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

'Covid 19 विरुद्ध जिंकूनच परत येईन', कोरोना योद्ध्यानं गाडीलाच बनवलंय घर

First published: May 1, 2020, 6:04 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading