आमदार रमेश कदमची पोलीस अधिकाऱ्याला अश्लील शिवीगाळ

रुग्णालयात घेऊन जाताना पोलिसांशी अरेरावी

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 19, 2017 01:11 PM IST

आमदार रमेश कदमची पोलीस अधिकाऱ्याला अश्लील शिवीगाळ

19 मे : अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी सध्या कारागृहात असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार रमेश कदम याने एका पोलीस अधिकाऱ्याला एकेरी आणि अत्यंत अर्वाच्च शब्दात अश्लील शिवीगाळ करण्याची घटना काल (गुरुवारी) सकाळी भायखळा कारागृहात घडली आहे.

रमेश कदम याला हाॅस्पिटलमध्ये नेत असलेल्या बंदोबस्तावरील सहाय्यक निरीक्षक मनोज पवार यांच्याशी सुमारे पाऊण तास तो उद्धट आणि उर्मट भाषेत बोलत होता. त्याचबरोबर पवार यांच्यावर दबाव आणण्यासाठी कदमने त्याच्या कार्यकर्त्याला पवार यांनी आपल्याकडे २५ हजार रुपये मागितल्याची तक्रार अप्पर आयुक्तांकडे करण्यास सांगितलं. तसंच, पवार यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्याची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची धमकी कदम याने दिली. त्याच्या या पवित्र्यामुळे स्थानिक पोलीस ठाण्यातून अतिरिक्त बंदोबस्त मागवण्यात आला. त्यानंतर त्याला जे.जे. हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.

कदम शिवीगाळ आणि धमकी देत असल्याचं व्हिडिओ एका मोबाईलमध्ये कैद करण्यात आलं असून ही व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे कदमाच्या या वर्तवणूकीबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, आमदार कदमच्या या शिवीगाळीबाबत दोघा पोलीस उपायुक्तांना कळवलं असून नागपाडा पोलीस ठाण्यात त्याबाबत 'डायरी'बनविली आहे. उद्या याबाबत पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सहाय्यक निरीक्षक पवार यांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 19, 2017 09:04 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...