'आमदार प्रताप सरनाईकांच्या वाढदिवशी झाली होती भेट'; हेगडेंच्या आरोपानंतर अखेर रेणू शर्मानं सोडलं मौन

'आमदार प्रताप सरनाईकांच्या वाढदिवशी झाली होती भेट'; हेगडेंच्या आरोपानंतर अखेर रेणू शर्मानं सोडलं मौन

भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या एका पत्रात रेणू शर्मा नावाच्या महिलेवर ब्लॅकमेल करत असल्याचे आरोप केले आहेत.

  • Share this:

मुंबई, 14 जानेवारी : सध्या राज्यभरातून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. भाजप नेते कृष्णा हेगडे (Krishna Hegde) यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या एका पत्रात रेणू शर्मा (Renu Sharma) नावाच्या महिलेवर ब्लॅकमेल करत असल्याचे आरोप केले आहेत. त्यानंतर आता रेणू शर्माने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलं आहे. धनंजय मुंडे यांनी हे सर्व जाणीवपूर्वक केल्याचं तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. मी कोणत्याही हनी ट्रॅपचा भाग नव्हते, असेही तिने यावेळी स्पष्टीकरण दिलं.

उलटपक्षी कृष्णा हेगडे यांनीच माझ्याशी बोलायला सुरुवात केली होती. ते मला आमदार प्रताप सिंह सरनाईक यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत भेटले होते. त्यांनी माझ्यावर जे काही आरोप लावले आहे, ते खोटे व बिनबुडाचे आहेत. धनंजय मुंडे यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला जात असून समाजात माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर अनेक गोष्टी समोर येत आहे.'रेणू शर्मा नावाची महिला मला 2010 पासून सतत फोन करून आणि मेसेज करून तिच्याशी संबंध ठेवावेत अशी गळ घालत होती. माझ्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ती अशा प्रकारे जाळं टाकून त्यात भुलवून  ब्लॅकमेल करते आणि पैसे लुबाडते. मी तिच्यापासून दूर राहण्यात यशस्वी ठरलो. तिला एकदाही भेटलो नाही. दोन दिवसांपूर्वी तिने धनंजय मुंडेंवर आरोप केलेले पाहिले आणि मी पोलिसांना ही माहिती देण्यासाठी पुढे आलो', असं हेगडे यांनी म्हटलं आहे.

ही बातमी सोशल मीडियावरील रेणू शर्मा यांच्या ट्विटवरुन करण्यात आली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून अद्याप यावर कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. त्यांनी याबाबत वक्तव्य केल्यास बातमी अपडेट करण्यात येईल.

Published by: Meenal Gangurde
First published: January 14, 2021, 8:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading