मुंबई, 14 जुलै : भाजपचे नेते नारायण राणे (narayan rane) यांची केंद्रात वर्णी लागली असून केंद्रीय मंत्रिपद मिळाले आहे. भाजपने (bjp) राणेंना मंत्रिपद देऊन शिवसेनाला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे आता नारायण राणेंचे चिरंजीव आमदार नितेश राणे (nitesh rane) यांना मुंबई महापालिका निवडणुकीच्या (mumbai municipal corporation election) कोर कमेटीवर (bjp Core Committee) घेण्यात आले आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपच्या कोअर कमेटीची आज मुंबईत बैठक झाली. भाजपा मुंबई प्रदेशने गठीत केलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणूक कोर कमेटीवर आमदार नितेश राणे यांची निवड करण्यात आली आहे.
पोलिसांचा 'मुळशी पॅटर्न'; कोयत्यासोबत भाईने काढले फोटो, नंतर कोठडीत जोडले हात!
या कमेटीत भाजपाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचा समावेश असून मुंबई भाजपा प्रदेश अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री आमदार आशिष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार पूनम महाजन, आमदार अतुल भातखळकर, सुनील राणे, अमित साटम, प्रसाद लाड, मनोज कोटक, प्रवक्ते संजय उपाध्याय आदी नेत्यांचा या कमेटीत समावेश आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी या कोर कमिटीच्या नेत्यांचा अनुभव महत्वपूर्ण ठरणार आहे.
राज्यात पावसाचा जोर कायम; मुंबईसह 12 जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट
विशेष म्हणजे, महापालिका निवडणुकीत शिवसेनेला घेरण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. राणे आणि शिवसेनेतला संघर्ष सर्वश्रुत आहे. त्यामुळे भाजपने याचा फायदा उचलत राणे कुटुंबाला पुढे केले आहे. याआधी निलेश राणे यांच्यावरही भाजपने नवीन जबाबदारी सोपवली. निलेश राणे यांची थेट प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर आता संपूर्ण कुटुंबाला शिवसेनेच्या विरोधात उतरवण्याची रणनीती भाजपने आखाली आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना विरुद्ध राणे असा संघर्ष पाहण्यास मिळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narayan rane, Nitesh rane