Home /News /mumbai /

एकनाथ शिंदेंच्या गटात फुटला 'बॉम्ब', खुद्ध उद्धव ठाकरेंनीच दिली माहिती

एकनाथ शिंदेंच्या गटात फुटला 'बॉम्ब', खुद्ध उद्धव ठाकरेंनीच दिली माहिती


गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत, आदित्य ठाकरे हे बंडखोर आमदार संपर्कात असल्याचा दावा करत आहे. आता

गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत, आदित्य ठाकरे हे बंडखोर आमदार संपर्कात असल्याचा दावा करत आहे. आता

गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत, आदित्य ठाकरे हे बंडखोर आमदार संपर्कात असल्याचा दावा करत आहे. आता

    मुंबई, २८ जून : शिवसेनेचे एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडीपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.शिंदे हे आपल्यासोबत ५० आमदार असल्याचा दावा करत आहे. पण आा खुद्द शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच काही बंडखोर आमदार संपर्कात असल्याचा दावा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत, आदित्य ठाकरे हे बंडखोर आमदार संपर्कात असल्याचा दावा करत आहे. आता त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे गुवाहाटी येथील शिवसेना आमदारांना आवाहन करत एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. 'आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही'अशी भावनिक साद मुख्यमंत्र्यांनी बंडखोर आमदारांना घातली आहे. 'माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा , यातून निश्चित मार्ग निघेल, आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू . कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही, समोर आलात बोललात तर मार्ग निघेल . शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे . समोर येऊन बोला आपण मार्ग काढू ' असंही उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, आज दुपारी एकनाथ शिंदे हे फोनवर बोलत हॉटेलच्या गेटवर (Radisson Blu a luxury hotel guwahati) आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांसोबत बोलत असताना शिंदे यांनी शिवसेनेला आव्हान दिलं.' गुवाहाटीमध्ये सर्व आमदार स्वता:च्या इच्छेनं आले आहे. कुणावरही जबरदस्ती केली नाही. आमच्याकडे ५० आमदार आहे. आमचे कोणतेही आमदार कुणाच्या संपर्कात नाही, जे कुणी संपर्कात असतील, त्यांची नावं सांगा', असं आव्हानच शिंदेंनी दिलं. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांनाही याची कुणकुण लागली असण्याची शक्यता आहे. शिंदे गटातील अनेक आमदार संपर्कात असल्याचा राऊत यांनी दावा केला होता. त्यामुळे या दाव्याला खोडण्यासाठी शिवसेनेच्या सर्व बंडखोर आमदारांच्याप्रतीक्रिया पाठवल्या जात आहे.शिंदे गटात कोणतेही मतभेद नाही तसेच स्वखुशीने आल्याचा उल्लेख केला जात आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या